सर्वात वर

Nashik News : साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक – (Nashik News) नाशिक मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाच्या उपाध्यक्षपदी डॉ. मो.स.गोसावी,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ,ना.दादा भुसे, आणि डॉ.प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 
अशी माहिती लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आमदार हेमंत टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 
नाशिकच्या कॉलेज रोड वरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात २६ ते २८ मार्च २०२१ ला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे,

संमेलनाध्यक्ष – डॉ. जयंत नारळीकर

स्वागताध्यक्ष – पालकमंत्री छगन भुजबळ

उपाध्यक्ष – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री दादा भुसे, डॉ. मो. स. गोसावी, प्रा. प्रशांत पाटील

कार्याध्यक्ष – हेमंत टकले, अॅड. विलास लोणारी

निमंत्रक – लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर

सल्लागार समिती – महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषद सीईओ लीना बनसोड, महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर


(Nashik News)