सर्वात वर

सुनील धोपावकर यांच्या “अक्षर उवाच” प्रदर्शनाचे उदघाटन

२३  ते २८ जानेवारी दरम्यान प्रदर्शनाचे आयोजन 

नाशिक – (Nashik News) नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन विभागातफे आयोजित सुप्रसिद्ध अक्षररचनाकार सुनील धोपावकर यांच्या बोलक्या अक्षराचे प्रदर्शन  “अक्षर उवाच”  या प्रदर्शनाचे उदघाटन काल  जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या हस्ते काल करण्यात आले दिनांक २३ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले रहाणार आहे. 

प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी लीना बनसोड म्हणाल्या  अक्षरांचे संस्कार व  वाचनाची आवड लहानपणापासून होती, पाश्चात्य साहित्य हे माझ्या जडण-घडणीत उपयोगी पडले. सहीश्रुता साहित्याने दिली, प्रदर्शनातील अक्षरे आपल्याशी बोलतात व चांगला संदेश देतात असे विचार अक्षर उवाच प्रदर्शनाचे उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी श्रीमती लीनाताई बनसोड यांनी केले.

आपुलकी, आस्ता व संस्कृती  माहित असलेल्या लीनाताई बनसोड आहेत. बोलकी अक्षरे शब्द बद्ध करणे हे  धोपावकर यांचे काम आहे, साहित्यातील वेगळा विषय व अक्षरे मुलांना  कळायला हवे असे नगरसेवक शाहू खैरे  यांनी कार्यक्रमाचे वेळी बोलतांना सांगितले. 

विविध काम करीत असताना देवनागरी लिपीत ५० फॉन्ट आहेत परंतु इंग्रजीत दीड लाखाचेवर फॉन्ट आहेत. भारतीय लिपीचा विषय भारतात शिकवला जात नाही, अक्षर सौंदर्य ओळखता यायला हवे असे सुनील धोपावकर यांनी आपल्या मनोगतात  व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सार्वजनिक वाचनालयाचे  कार्याध्यक्ष वसंत खैरनार हे होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सानेगुरुजी व सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक प्रा.सोमनाथ मुठाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सविता कुशारे  यांनी करून दिला. ज्योती फड यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता बागुल यांनी केले. 

कार्यक्रमास सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, बालभवन प्रमुख संजय करंजकर, अॅड. अभिजीद बगदे, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, गीतकार मिलिंद गांधी,आनंद ढाकीफळे, ग्रंथ मित्र विनायक रानडे,  शाम दशपुते यांचेसह अनेक मान्यवर  उपस्थित होते.(Nashik News)