सर्वात वर

Nashik News : महानगरपालिका निवडणुक तयारीसाठी मनसेच्या प्रभाग बैठका सुरु

नाशिक- (Nashik News) आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तयारी सुरु झाली आहे. शहरातील प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी मनसे तर्फे प्रभागनिहाय बैठका सुरु आहेत.शहरात अनेक समस्या आहेत त्यासाठी मनसे आता आक्रमक होणार आहे. त्याअनुषंगाने पूर्व नाशिक (पंचवटी) विभागाच्या प्रभाग क्रमांक ४, ५ व ६ च्या बैठका  झाल्या.

या बैठकीत प्रदेश सरचिटणीस मा. अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी पूर्व नाशिक (पंचवटी) विभागाच्या प्रभाग क्रमांक ४,५ व ६ मधील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच संघटना बांधणी व आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीं विषयी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार, पंचवटी विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्ष पद्मिनीताई वारे, शहराध्यक्षा अरुणाताई पाटील, मनसे नगरसेविका गटनेत्या सौ. नंदिनीताई बोडके, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, मिलिंद गोसावी, श्रीराम कोठुळे, नवनाथ जाधव, मनसे रस्ते आस्थापना सेनेचे अभिजीत गोसावी, खंडू बोडके, मुक्ताताई इंगळे, कल्पना जाधव, गोपी पगार, अजिंक्य बोडके, भीमा लिलके या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.(Nashik News)