सर्वात वर

Nashik-बाळासाहेब सानप यांची घर वापसी : सोमवारी भाजपा प्रवेश

Nashik News

नाशिक- (Nashik News ) नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा पुन्हा भाजपा प्रवेश निश्चत झाला असून सोमवारी दुपारी ते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याचे बाळासाहेब सानप यांनी जनस्थानशी बोलतांना सांगितले. 

विधानसभा निवडणुकीत तिकीट भाजपाने तिकीट नाकारल्या मुळे नाराज झालेले बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून नाशिक पूर्व प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती.पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेथही त्याचे मन न रमल्याने अखेर त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. 

कालच त्यांची मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी बाळासाहेब सानप यांनी आपली  खंत व्यक्त केली होती. अनेक दिवसांपासून त्यांची भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु होती अखेर सोमवारी २१ डिसेंबरला  त्यांचा भाजपा प्रवेश होणार हे आता निश्चित झाले आहे. 

नाशिक महानगर पालिका निवडणुकीत होणार फायदा 

बाळासाहेब यांच्या भाजपा प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीत भाजपाला मोठा फायदा होणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणूक भाजपाने बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाल्याने भाजपाची महापालिकेवर सत्ता आली होती. बाळासाहेब सानप यांच्या भाजपा प्रवेशनंतर त्यांच्यावर पुन्हा शहराची जवाबदारी देणार असल्याचे बोललेजात आहे.

Nashik News