सर्वात वर

कृषीमंत्री दादा भुसे कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक- महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तशी माहिती स्वतः दादा भुसे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. दादा भुसे यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दोन दिवसापूर्वी दादा भुसे यांना मणक्याचा त्रास सुरु झाला होता त्यावर उपचार करण्यासाठी ते मुंबईत गेले होते. त्यावेळी त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. गेल्या दोन दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांची आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन हि दादा भुसे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून केले आहे.