सर्वात वर

Nashik News : सरपंच पदासाठी चक्क २ कोटींची बोली

नाशिक :(Nashik News) सध्या वातावरणात थंडी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात गारवा जरी वाढला असला तरी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.ग्रामपंचात निवडणुकीच्या हालचाली ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत.या साऱ्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील एका घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. 

(Nashik News )जिल्ह्यातील देवळा तालुक्यात उमराणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत  सरपंचपदा साठी चक्क लिलाव करण्यात आला.येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात समस्त ग्रामस्थांनी या सभेत सहभाग घेतला. सभेत रामेश्वर महाराज मंदिर बांधकामासाठी लिलाव बोली लावण्यात आली. हि बोली जो जिंकेल त्याला सरपंच पद बहाल करण्यात येणार होते.

नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व उमराणे ग्रामपंचायत माजी सरपंच प्रशांत उर्फ चंदूदादा देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं हा लिलाव जिंकला. या पॅनलकडून मंदिरासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावली होती.लिलाव जिंकल्या ग्रामपंचायतीचा कारभार लिलाव जिंकलेल्या पॅनल कडे गेल्यानंतर  ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात आली. या पंचक्रोशीत असा पहिल्यांचाच निर्णय झाला आहे. या लिलावाची चर्चा आता सर्वदूर सुरु असून अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत अशी प्रथा पडण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.