सर्वात वर

Nashik News : नटसम्राट स्वगत स्पर्धेचा निकाल जाहीर

Nashik News कुसुमाग्रज मराठी विचार मंच, नाशिकच्या वतीने  वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त नाटकातील स्वगतांच्या सादरीकरणाची ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्वगत स्पर्धेला संपुर्ण महाराष्टातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन भरघोस प्रतिसाद मिळाला. सदर स्पर्धा कुमार गट आणि खुला गट अशा दोन गटात घेण्यात आली होती. प्राथमिक फेरीतील पात्र प्रवेशिकांची अंतिम फेरीत निवड करुन परिक्षकांचे परिक्षण तसेच प्रेक्षकांचे ऑनलाईन मतदान घेण्यात आले. प्रेक्षकांचे मतदान मंचाच्या वेबसाईटवर (https://kusumagrajmvm.org) तसेच युट्युब चॅनेलवर घेण्यात आले होते. परिक्षकांचे गुण तसेच प्रेक्षकांची संख्या, श्रेणी, लाईक्स इत्यादी बाबींचा विचार करुन अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली.

विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत महाराष्ट्र आणि  महाराष्ट्राबाहेरील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जगभरातुन प्रेक्षकांनी वेबसाईट तसेच युट्युबवर व्हिडीओ पाहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. संस्थेच्या वेबसाईट आणि युट्युब चॅनलवरुन रसिकांनी या स्पर्धेत सहभागी कलावंतांना दाद आणि गुणांकन दिलेया स्पर्धेचे परिक्षक म्हणून ज्येष्ठ नाट्य कलावंत मा. उपेंद्र दाते आणि  प्रमोद टेंबरे यांनी काम पाहिले.

स्पर्धा यशस्वीततेसाठी डिझायनर भुषण क्षीरसागर , व्हिडीओ  संकलक महेश कावळे,तांत्रिक सहाय्य उपेंद्र वैद्य आणि मेधा वैद्य यांनी आपले योगदान दिले. स्पर्धा प्रमुख संस्थेचे विश्वस्त शाम पाडेकर, सुभाष सबनीस हे होते तर अध्यक्ष सतीश बोरा, सरचिटणीस दिलीप बारवकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

स्पर्धेचा निकाल

कुमार गट

प्रथम क्रमांक -सोहम संदिप शहापूरकर (क्र २१), बेळगाव

द्वितीय क्रमांक – वेदिका भुषण पंचभाई (क्र ४७), नाशिक

तृतीय क्रमांक – राजसी दिपक गोजगेकर (क्र ३६), बेळगाव

उत्तेजनार्थ  – युगा मिलिंद कुलकर्णी (क्र ३५),नाशिक आणि गार्गी सचिन ब्राह्मणकर (क्र ४१), नाशिक

खुला गट

प्रथम क्रमांक – तुकाराम माधव नाईक (क्र ८), मु.पो.सातपाटी, पालघर

द्वितीय क्रमांक –  विवेकानंद राजाराम दासरी (क्र १६), ठाणे (पश्चिम)

तृतीय क्रमांक – सुरेंद्र जगदिश गुजराथी (क्र २७) , संगमनेर , अहमदनगर

उत्तेजनार्थ – महेंद्र शंकर गुरव (क्र ११) मु.प. आरे, गुहागर, रत्नागिरी आणि अविनाश रामगीर गोस्वामी (क्र ४), सांगली.

२३ डिसेंबर ला नटसम्राट नाटकाचे आयोजन 

पन्नास वर्षांपूर्वी २३ डिसेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता त्यानिमित्ताने बुधवार दिनांक २३/१२/२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता कालिदास कला मंदिर , नाशिक येथे नटसम्राट नाटकात प्रमुख भुमिका साकारणारे जेष्ठ कलावंत मा.उपेंद्र दाते यांचा नटसम्राट नाटकाचा एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. या  कार्यक्रमाला सर्व नाशिककर नाट्यरसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व कलाकारांचे, परिक्षकांचे, जगभरातील प्रेक्षकांचे कुसुमाग्रज मराठी विचार मंच आभार मानले आहे.