सर्वात वर

Nashik News : नाट्य परिषदेच्या रंगकर्मी पुरस्काराची घोषणा

बातमीच्या वर

नाशिक – (Nashik News) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दरवर्षी  देण्यात येणारे रंगकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ,अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी नाट्यपरिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हि घोषणा केली, 

दहा  रंगकर्मी पुरस्कार तसेच  संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या रंगकर्मींना यंदा सन्मानित करण्यात येणार आहे. दोन हजार रुपये रोख प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे रंगकर्मी पुरस्काराचे स्वरूप आहे. नाट्यगृह सुरळीत सुरु झाल्यानंतर लवकरच हे पुरस्कार देण्यात येतील  तसेच यापूर्वी जाहीर झालेले वि वा शिरवाडकर ,वसंत कानेटकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार निवड समितीत शाहू खैरे,सुनील ढगे ,ईश्वर जगताप,राजेश जाधव,राजेश भुसारे, विजय शिंगणे यांचा समावेश होता. या पत्रकार परिषदे प्रसंगी नाट्य परिषदेचे सुनील ढगे , विशाल जातेगावकर,अभय ओझरकर, पीयूष नाशिककर, विनोद राठोड ,प्रवीण कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते,(Nashik News)


हे आहेत पुरस्कारार्थी 

स्वर्गीय दत्ता भट स्मृती अभिनय पुरस्कार  (पुरुष) – राजेंद्र चव्हाण 

स्वर्गीय शांता जोग स्मृती  अभिनय पुरस्कार  ( स्त्री) – रोहिणी ढवळे  

स्वर्गीय प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार  ( (दिग्दर्शन)- प्रा, रवींद्र कदम,

स्वर्गीय नेताजी भोईर स्मृती पुरस्कार  (लेखन)- विवेक गरुड 

स्वर्गीय वा श्री पुरोहित  स्मृती पुरस्कार  ( बालरंगभूमी ) – धनंजय वाबळे 

स्वर्गीय जयंत वैशंपायन  स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता) फणींद्र मंडलिक 

स्वर्गीय रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार (नेपथ्य ) – चंदकांत जाडकर  

स्वर्गीय गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार (प्रकाश योजना) – विजय रावळ 

स्वर्गीय डॉ रामदास बरकले  स्मृती पुरस्कार (लोककलावंत) – रमाकांत वाघमारे 

स्वर्गीय शाहीर गजाभाऊ बेणी  स्मृती पुरस्कार – राजन अग्रवाल 


विशेष योगदान पुरस्कार (संगीत क्षेत्र) 

डॉ. अविराज तायडे 

सुभाष दसककर 

नितीन पवार 

नवीन तांबट 

विशेष कोविड योद्धा पुरस्कार 

डॉ संजय धुर्जड 

डॉ मिलिंद पवार 

दिवंगत रंगकर्मींचा कुटुंबीयांचा सन्मान 

स्वर्गीय विवेक पाटणकर 

स्वर्गीय किशोर पाठक 

स्वर्गीय शारदा गायकवाड 

तसेच पुढील वर्षपासून सर्वोत्कृष्ठ  कार्यकर्ता पुरस्कार देनाय्त येणार असल्याची माहिती परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली