सर्वात वर

Nashik News : राष्ट्रवादीची एक सदस्यीय वॉर्ड रचनेची मागणी

Nashik News Update : सिंगल वार्डच्या मागणीसाठी नेतेमंडळी पक्षश्रेष्ठींकडे जाणार

नाशिक – (Nashik News) नाशिक महानगरपालिका निवडणुका काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती आखण्याचे काम असुर आहे. नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामाला लागली असून वार्ड रचना व इतर महत्वांच्या विषयावर राष्ट्रवादी भवन येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली.

या बैठकीत शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, अशोक सावंत, मनपा गटनेते गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, जीवन रायते, कुणाल बोरसे, मुजाहिद शेख, प्रशांत वाघ आदि उपस्थित होते.

नाशिक महानगरपालिका निवडणुकीस सव्वा वर्ष शिल्लक राहिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. प्रभाग निहाय बैठका पार पाडत नाशिक शहरात वातावरण निर्मिती केल्यावर जनतेत जाऊन नागरी समस्या जाणून घेतल्या. यात नागरिकांचाही मोठा सहभाग लाभला होता.प्रभाग निहाय बैठकांमध्ये सर्व स्तरातून सिंगल वार्ड अर्थात एक सदस्यीय प्रभाग रचनाची मागणी होत असताना या मागणीसह इतर महत्वाच्या विषयावर विचार विनियम करण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

मागील महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने चार सदस्यीय प्रभाग रचना केल्यामुळे नाशिकचा विकास होऊ शकला नाही. प्रभागातील कामांमध्ये श्रेय मिळणार नाही तसेच सीमारेषेमुळे प्रभागात कामे झाली नाही. एक सदस्यीय प्रभाग रचनेत विकास कामे होतात तसेच प्रभागात एकच नगरसेवक असल्याने नागरी समस्या सोडवण्यास वाव मिळत असल्याने नागरिकांच्या हिताकरिता व आपले जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याकरिता सिंगल वार्ड होणे गरजेचे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

सिंगल वार्ड या प्रमुख मागणीसह इतर महत्वाच्या विषयांसाठी नाशिक शहरातील प्रमुख नेतेमंडळी पालकमंत्री छगनराव भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे बैठकीत ठरले.(Nashik News)