सर्वात वर

Nashik News : मनपाने फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा – जयप्रकाश छाजेड

बातमीच्या वर

नाशिक:- (Nashik News) संपूर्ण जग कोरोना मुळे ठप्प झाले आहे.आजही कोरोनाच्या विकाराबाबत संशोधन सुरु आहे. कोरोना बाधितांना श्वसनाचा त्रास होणे हे प्रमुख कारण आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रदुषणामुळे श्वसनाचे विकार टाळण्यासाठी यंदाची दिवाळी नाशिक महापालिका क्षेत्रात फटाकेविरहित  दिवाळी म्हणून साजरी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केली आहे.

या संदर्भात नाशिक महानगरपालिका आयुक्त मा.कैलास जाधव तसेच महापौर सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले आहे. या  निवेदनात म्हटले आहे, की गेल्या सात-आठ महिन्यांपासुन जगभरात कोरोना  संकटाने थैमान घातले असून लाखो नागरिकांचा बळी घेतला आहे. अद्याप हे संकट टळलेले नसून येत्या हिवाळ्यात दूसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळी सण साजरा करताना नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळणे अत्यंत आवश्यक आहे. कोविडमधुन बरे झालेल्या रुग्णांना तसेच नाशिककरांनाही या धुरामुळे श्वसनाचे आजार जडू नयेत तसेच नाशिकची प्रदूषण पातळी नियंत्रित राहावी यासाठी महानगरपालिकेनेच फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन नाशिककरांना करावे असे आवाहन माजी आमदार तथा महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केले आहे.(Nashik News)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली