सर्वात वर

कवी राजू देसले यांच्या ‘अवघेचि उच्चार’ कवितासंग्रहाचे रविवारी प्रकाशन

नाशिक (Nashik News) : सुप्रसिद्ध कवी राजू देसले (Raju Desle) यांच्या ‘अवघेचि उच्चार’ कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवार दि.२१ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वा.गंगापूररोड येथील कुसुमाग्रज स्मारक, येथे आयोजित करण्यात आले आहे.

विश्वास ग्रुप, ग्रंथ तुमच्या दारी, कॉपर कॉईन पब्लिशिंग, पुस्तक पेठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न होत आहे. 

ख्यातनाम लेखक रंगनाथ पठारे यांच्या शुभहस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख विश्वास जयदेव ठाकूर आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेते दीपक करंजीकर, अभिनेते किशोर कदम उर्फ कवी सौमित्र, कवी-चित्रकार मंगेश नारायणराव काळे, शब्दालय प्रकाशनाच्या प्रकाशिका, कवियित्री सुमती लांडे, कवी कादंबरीकार प्रवीण बांदेकर, कॉपर काईनचे संचालक सरबजीत गरचा, कवी समिक्षक गोविंद काजरेकर, लेखिका डॉ. निर्मोही फडके आदी उपस्थित राहणार आहेत. प्रकाशन सोहळ्यात ‘अवघेचि उच्चार’ कवितासंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन अभिनेते किशोर कदम व डॉ. निर्मोही फडके करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंद बेदरकर करणार आहेत.

तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देविदास चौधरी, प्रकाश होळकर, विनायक रानडे, निखिल दाते यांनी केलेे आहे. या कार्यक्रमात मास्क व सोशल डिस्टंसिंग अनिवार्य असणार आहे.(Nashik News)