सर्वात वर

Nashik News : नाशिक महानगर पालिकेत भरती होणार !

शिवसेना नगरसेवक व नाशिक म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्ष प्रवीण (बंटी) तिदमे यांच्या प्रयत्नांना यश 

नाशिक – (Nashik News) नाशिक महानगर पालिकेत अखेर भरती होणार हे स्पष्ट झाले आहे. नगरसेवक व नाशिक म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्ष प्रवीण(बंटी) तिदमे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुकंपा तत्त्वावरील भरतीस नगर विकास विभागाने हिरवा कंदिल दाखवला आहे. 

२०१५ पासून ते आता पर्यंतची अनुकंपा तत्वावरील रिक्तपदे सरकारी नियमानुसार भरण्यात यावी असे पत्र नगरविकास विभागाकडून नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांना देण्यात आले आहे.अशी माहिती शिवसेना नगरसेवक व नाशिक म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्ष प्रवीण(बंटी) तिदमे यांनी दिली आहे. 

गेल्या काही वर्षात महापालिकेतून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत.आता या अनुकंपा तत्वानुसार तब्बल १९७ पदे आता महापालिकेला भरता येणार आहेत. या नवीन भरतीमुळे  नागरिकांच्या अडचणी दूर होऊन नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांकडून सेवा मिळणार आहेत. (Nashik News)