सर्वात वर

मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार यांना समाज भूषण पुरस्कार

नाशिक : (Nashik News) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार यांना समाज भूषण पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले.महाशिवरात्री ११ मार्च २०२१ रोजी ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या वतीने श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते अंकुश पवार यांना मानवता धर्म, शिक्षण, पर्यावरण संरक्षण, आरोग्य क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार देऊन सम्मानीत करण्यात आले. 

जागतिक कोविड महामारी काळात गोरगरीब कष्टकरी लोकांना मास्क, सेनेटायझर, जीवनावश्यक वस्तू, किराणा, औषध वाटप, अनेक रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळवून देणे, लॉकडाऊन काळात कामगार, कोविड योद्ध्यांसह अनेकांना त्यांचे हक्काचे पगार मिळवून देणे सारख्या निस्वार्थपणे केलेल्या समाज सेवेकरीता अंकुशभाऊ पवार यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार ईचम यांच्या हस्ते शहराध्यक्ष अंकुश पवार यांना समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके व सुरेश घुगे, शहर उपाध्यक्ष विजय आहिरे व अक्षय खांडरे, विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, शहर सरचिटणीस राकेश परदेशी, संघटक संजय देवरे, अमित गांगुर्डे, हरीश गुप्ता, रोजगार सेना जिल्हा प्रमुख किशोर वडजे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष अभिजित गोसावी, मनविसे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड, मनविसे शहराध्यक्ष संदेश जगताप, अॅड. अभिजित बगदे, धनराज रणदिवे, गणेश झोमान, पंकज बच्छाव, चारुदत्त भिंगारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.(Nashik News)