ज्येष्ठ तबलावादक नवीन तांबट यांच्या शोकसभेचे रविवारी आयोजन

नाशिक – शहरातील ज्येष्ठ तबलावादक नवीन तांबट यांचे शुक्रवारी निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान,लोकहितवादी मंडळ व शहरातील सर्व सांस्कृतिक संस्थानच्या वतीने कुसुमाग्रज स्मारक,गंगापूर रोड येथे रविवारी (६ डिसेंबर) रोजी सायंकाळी ५ वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नवीन तांबट यांचे निधन झाल्याने शहराच्या सांस्कृतिक चळवळीचा आधारवड कोसळला आहे. अनेकांना त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याची इच्छा होती.परंतु शासकीय नियमानुसार सहभागी होता आले नाही. या शोकसभेला शहरातील सर्व संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सरकारी सुचनेचे पालन करून शोक सभेस उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांनी व्यक्त केले आहे.
