सर्वात वर

Nashik News : नाशिकच्या तरुणांनी मानले महानगरपालिकेचे आभार

बातमीच्या वर

Nashik News : ऋणनिर्देश पत्राद्वारे व्यक्त केल्या भावना 

नाशिक- (Nashik News )कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या खाजगी हॉस्पिटलकडून रुग्णांच्या उपचाराअंती अव्वाच्यासव्वा बिलांची आकारणी केली जात होती. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांना कोरोना आणि हॉस्पिटलचे बील अशा दोन्ही संकटाचा सामना करावा लागत होता.अतिरिक्त बील भरण्यास पैसे नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाना उधार उसनवारी करून हॉस्पिटलची बील भरावी लागत होती.हॉस्पिटलच्या या कारभाराच्या  अनेक तक्रारी सुद्धा महानगरपालिकेल्या येत होत्या.त्याची महानगर पालिकेने दखल घेत तात्काळ कठोर पावले उचलून तब्बल अडीच कोटींपेक्षा अधिक रकमेची वसुली करून नऊ हजार पेक्षा जास्त रुग्णांना दिलासा दिला 

त्यामुळे अनेक सर्वसामान्य रुग्णांना देखील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेणे शक्य झाले महानगर पालिकेच्या याच कार्यतत्परते बद्दल तरुणांनी एकत्र येत केवळ टीका न करता चांगल्या कामला प्रोत्साहन या उदात्त हेतून भूषण काळे व रवी जन्नावार यांच्या संकल्पनेतून एक ऋणनिर्देश पत्र देऊन महानगरपालिकेचे आभार मानले  जेष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांच्या हस्ते पत्र प्रदान करण्यात आले भूषण काळे, रवी जन्नावार,देवांश जोशी,शुभम शेंडे,केशव कासार आदी उपस्थित होते बागेश्री पारनेरकर यांनी आभार पत्राचे वाचन केले

यावेळी बोलतांना आयुक्त कैलास जाधव यांनी तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद असून यामुळे महानगरपालिकेला नक्कीच नवीन काम करण्यास बळ मिळेल अशा भावना व्यक्त केल्या (Nashik News)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली