सर्वात वर

नाशिक मध्ये दुसऱ्या दिवशी हि दाट धुके : महाराष्ट्राला धुके आणि दवाचा धोका !

धुके म्हणजे काय ? का पडते धुके ! याविषयी ची माहिती जाणून घ्या  भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांच्या कडून 

अंदाज नव्हे माहिती !

Prof.-KiranKumar-Johare
भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे

नाशिक : नाशिक मध्ये(Nashik News Today) दुसऱ्या दिवशी सुद्धा दाट धुके पडले आहे. सामान्य नागरिक या गुलाबी थंडीचा आणि धुक्याचा आनंद जरी घेत असला तरी शेतकरी मात्र चिंतेत आहे.या धुक्या मुळे द्राक्षाला पिकाला फटका बसणार आहे. येत्या २० डिसेंबर पासून थंडी वाढून द्राक्ष मण्यांना तडा जाऊ शकतील. परीणामी ३० टक्क्यांपेक्षा जास्त द्राक्ष निर्यात घटण्याची भिती आहे. मात्र लवकरच धुके दूर होत सुर्यप्रकाश पडणार असल्याने द्राक्षात साखर भरणार ही चांगली बाब आहे. कांद्याचे उत्पादन थंडीमुळे दिडपट वाढणार असे प्रतिपादन भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे ‘जनस्थान’शी बोलतांना केले आहे. 

महाराष्ट्राला धुके आणि दवाचा धोका !

महाराष्ट्रात जागोजागी पहाटे व सायंकाळी धुके व दव पाहण्यास मिळते मात्र ही पावसाळा संपल्याची लक्षणे नाहीत ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. यावर्षी जुलै, ऑगस्ट , सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर आणि आता डिसेंबर मध्ये देखील धुके पडले आहे जे मान्सून व चक्रीवादळ पॅटर्न बदलाचे ‘न्यू नाॅर्मल’ आहे. ढगातील बाष्प जमिनीवर आल्याने वातावरणात आर्द्रता वाढलयाचा हा परीणाम आहे असे या मागचे विज्ञान आहे. द्राक्ष, डाळिंब आदी पिकांना यांपासून धोका असल्याने शेतकर्यांनी सुयोग्य उपाययोजना कराव्यात असे ही भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. 

“वातावरणातील आर्द्रता वाढलेल्याने दाट धुके निर्माण झाले. तापमानात घट झाली त्यामुळे बाष्प जमिनीवर आले. परिणामी दृश्यमानता कमी झाली. 20 डिसेंबर नंतर थंडी वेगाने वाढेल. येत्या काळातही अशा प्रकारचे दाट धुके आणि दव यांचा सामना महाराष्ट्राला करावा लागणार आहे.”

धुके एक नैसर्गिक प्रक्रिया 

धुके पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रीया आहे. अनेकदा दाट धुक्यात अगदी समोर असलेली व्यक्ती देखील दिसू शकत नाही. वाहतूकीत खोळंबा, विमानाची उड्डाणे रद्द होणे, रेल्वे अपघात आदीस धुके कारणीभूत ठरते. धुक्याचे अस्मानी संकट पिकांची नासाडी करीत महागाई वाढविते. धुक्याबाबत ‘अलर्ट’ देणार्या यंत्रणेची सातत्याने मागणी भारतीय शेतकरी करीत आला आहे. धुके पडण्याच्या आधीच पिकांच्या संरक्षणाची काळजी घेणे आवश्यक आहे. धुक्यामुळे २०१९ साली महाराष्ट्रात ७०० टनांपेक्षा अधिक निर्यातक्षम द्राक्षांचे व किमान दहा कोटी रूपये रकमेचे ठरलेले सौदे स्थगित झालेत.

धुके म्हणजे काय ?

धुके म्हणजे पाणी आणि बर्फाचे अत्यंत सुक्ष्म कणांचे तरंगते थर होय. धुके म्हणजे जमिनी लगत तरंगते ढगच होय. व्हीजिबिलीटी (VIZIBILITY) म्हणजे ‘द्दष्यता’ कमी करण्यास धुके कारणीभूत ठरते. ‘किमान एक किलोमीटर वरील द्दष्य न पाहता येण्यासारखी स्थिती म्हणजे धुके’ आहे अशी शास्त्रीय भाषेत धुक्याची व्याख्या करता येते. दाट धुक्यात 50 मीटर अंतरावरील द्दश्य ही पाहणे कठीण होते.धुक्यात वाहन चालवितांना दक्षता गरजेची आहे.

का पडते धुके?

थंडीत हवेतील आर्द्रता शंभर टक्के झाली तरी धुके निर्माण होते. मात्र ९५ टक्क्यापेक्षा कमी आर्द्रता असतांना देखील धुके पडू शकते. बाष्पाचा मुबलक पुरवठा असतांना पाण्याचा गोठण बिंदू आणि वातावरणाचे तापमान यात ढोबळमानाने अडीच डिग्री सेल्सिअस इतका तापमानातील फरक आढळल्यास धुके निर्मितीस अनुकूल स्थिती तयार होते. थंडीत धुके पडण्या मागचे हेच कारण होय.

मुबलक पाणी आणि त्याचे बाष्पीभवन होण्यासाठी लागणारे तापमान, वार्याची स्थिती अशा अनेक गोष्टींवर धुके अवलंबून असते. धुक्यासाठी बाष्पाचा पुरवठा हा जवळचा समुद्र, नदी, तलाव, ओढा किंवा तळ्यातील पाण्यापासून होतो. अनेकदा सुर्याची उष्णता देखील जमिनी पर्यंत पोहचण्यास दाट धुके हे अडथळा ठरते. ढगाळ वातावरणात दिवस धुक्याची चादर अनेक पसरते. दहा-पंधरा डिग्री सेल्सिअस तापमानात देखील धुके पसरते दिसून येते अशी हवामान माहिती प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली.

कोडे धुक्याचे !

धुके कधी पडेल याचा अंदाज तंत्रज्ञानाने घेता येतो. मात्र असे असले तरी धुके बनतांना प्रदेश निहाय परिस्थिती ही एखाद्या कोड्यासारखी अनाकलनीय ठरते.

धुक्यावर उपाय

आइसलॅंड (Island) येथील ‘ग्रँड बँकस्’ (Grand Banks) हे जगातील सर्वात जास्त धुके असणारा प्रदेश होय. जमिनीवर सर्वाधिक धुके असलेल्या प्रदेशात अर्जेंटिना, न्यूफाउंडलँड, लॅब्राडोर व पाँइंट रेयज, कॅलीफोर्निया या ठिकानांचा समावेश होतो. या ठिकाणी वर्षातील २०० दिवस धुके आढळते. ‘ग्लोबल कुलिंग’मुळे धुक्याचे क्षेत्र वाढत आहे. पाश्चिमात्य देशात अनेकदा विमानतळावर ‘आयन जनरेटर’ वापरून धुके दूर करतात असे ही प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

प्रा किरणकुमार जोहरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी :
प्रा किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ 9970368009, 9168981939

[email protected] www.kirankumarjohare.org  Facebook Id Kirankumar  Kiku