सर्वात वर

Nashik News : उमराणे सह खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द

(Nashik News) सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलाव प्रकरणावर निवडणूक आयोगाची कारवाई 

नाशिक – (Nashik News) नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील सरपंच व सदस्य पदाची निवडणूक काही दिवसापूर्वी सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकी संदर्भात अनेक चर्चा झाल्या होत्या या निवडणुकीची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने हि निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील उमराणे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक लिलाव पद्धतीने झाल्याने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा अहवाल दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी  निवडणूक आयोगाला सादर केला.त्याची गंभीर दखल घेऊन या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने रद्द केल्या असल्याचे निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांनी सांगितले आहे. निवडणूक निरीक्षक ,जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांचे शेरे घेऊनच हि कारवाई केली आहे. 

निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक होण्यासाठी आयोग कटिबद्ध असून या पुढे असे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाही असे मदान यांनी स्पष्ट केले.आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात उमराणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत  सरपंचपदा साठी लिलाव करण्यात आला होता.सभेत रामेश्वर महाराज मंदिर बांधकामासाठी लिलाव बोली लावण्यात आली. हि बोली जो जिंकेल त्याला सरपंच पद बहाल करण्यात येणार होते.एका पॅनलकडून मंदिरासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावली होती.लिलाव जिंकल्या ग्रामपंचायतीचा कारभार लिलाव जिंकलेल्या पॅनल कडे गेल्यानंतर  ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती .

निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त करून देणे व निवडणूका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही प्रशासनाची संविधानिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात सखोल चौकशी करून परिपूर्ण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यावर आयोगाने संविधानिक अधिकार वापरून निर्णय घेतलेला आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक