सर्वात वर

Nashik : नगरसेविका कु नयना भरत गांगुर्डे यांच्या निधीतून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन

नाशिक-  कोरोना महामारी संकट काळात रुग्णांची वाढती संख्या व अपुरी आरोग्य व्यवस्था तसेच ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका कु नयना भरत गांगुर्डे यांच्या स्वेच्छा निधीतून ५ लिटर क्षमता असलेले १० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन (Oxygen Concentrator Machine) नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

आज पहिल्या टप्प्यात २ मशीन जनतेच्या सेवेत उपलब्ध झालेले असून हे मशीन (Oxygen Concentrator Machine) ८०/८२ पर्यंत ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांना हॉस्पिटल मधे जागा उपलब्ध होई पर्यंत साधारण  ८ ते १० तास घरीच ऑक्सिजन पातळी टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरत आहे. त्यामुळे गरजू रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

गरजूंनी नगरसेविका कु नयना भरत गांगुर्डे यांचे संपर्क कार्यलय प्रभुज अंटलाटिस अपार्टमेंट समोर रामेश्वर नगर पाईप लाईन रोड नाशिक.किंवा मो.नं- 9665448725 /9011007704 / 8855855877 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीनची (Oxygen Concentrator Machine) गरज भासल्यास त्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतील 

आवश्यक कागदपत्रे

१)आधार कार्ड झेरॉक्स
२) कोवीड टेस्ट रिपोर्ट 
३) सिटी स्कन रिपोर्ट
४)दोन पासपोर्ट साईज फोटो.

Nashik Oxygen Concentrator Machine funded by corporator Nayana Gangurde