सर्वात वर

Nashik : शहरात ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव धोक्यात

शहरात एका रूग्णांलयातील ऑक्सिजनचा साठा संपल्याने रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्याचा सल्ला

नाशिक – शहरात काही दिवसापासून कोरोनाचा संसर्ग  प्रमाणावर वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन (Oxygen)बेड सह  व्हेंटीलेटरची गरज भासते आहे.नाशिक शहरात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचे प्रशासन एककीकडे सांगत असले तरी नाशिक शहरातील एका खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा (Oxygen) संपल्याने रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्याचा सल्ला हॉस्पिटल प्रशासनाने दिल्या मुळे रुग्णांचे नातेवाईक या सल्ल्यामुळे धास्तावले आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये दररोज चार ते साडेचार हजार रुग्ण कोरोना बाधित होत आहेत. यातील अनेक रुग्णांना हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागत आहे. यासाठी महापालिकेची रुग्णालये,कोव्हीड केअर सेंटर मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.त्याबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्ये ८० टक्के बेड राखीव ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती अतिशय गंभीर आहे.अनेक रूग्णांलयांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने रूग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. 

आज शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील एका खाजगी रूग्णालयांत ऑक्सिजन (Oxygen)अभावी रूग्णांना अन्यत्र हलविण्याची वेळ आली. या रूग्णालयात ३० रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र या रूग्णालयाचा ऑक्सिजनचा साठा संपल्याने या रूग्णांना इतरत्र हलविण्याचा सल्ला संबधित रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन बेडची शोधशोध करावी लागत आहे. यामुळे रूग्णांलयात एकच गोंधळ उडाला.