सर्वात वर
AC Ad

झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती २२ रुग्णांचा मृत्यू : मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर


ऑक्सिजन टाकीत भरत असता ही घटना घडली

नाशिक – नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटल (Zakir Hussain Hospital)मध्ये ऑक्सिजन गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत रुग्णालयातील २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे. या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. 

घटनेची माहिती कळताच पालकमंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. 

राज्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत ठेवण्याचे व रुग्णालयांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोनासंकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. 

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील (Zakir Hussain Hospital) दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णांलयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. 

मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर :  उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

या संपूर्ण घटनेत (Zakir Hussain Hospital) उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत असे जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे असे हि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले 

कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले  ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले 

यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


ऑक्सिजन टाकीत भरत असता ही घटना घडली

झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) १५० रुग्ण होते. त्यातील २३ जण व्हेटीलेंटवर होते, अशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. या घटनेमुळे ३०-३५ जणांचा प्रकृती चिंताजनक आहे. काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात वर्ग केले जात आहे. चिंताजनक असलेल्या त्वरित उपचार केले जात असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल  सांगण्यात आले आहे.

दुपारी साडेबाराच्या सुमारास नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) टँकर मधून ऑक्सिजन भरण्याचे काम सुरु त्यावेळी लिकेज मुळे ऑक्सिजनची गळती झाली. त्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल रुग्णांना होणारा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने या घटनेत या रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

(Zakir Hussain Hospital) घटनास्थळी महापौर सतीश कुलकर्णी ,खा.हेमंत गोडसे ,शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर,समता परिषदेचे दिलीप खैरे यांनी ही तातडीने भेट दिली.  

Ac square