सर्वात वर

नाशिक पोलीस उतरले रस्त्यावर : निर्बंध तोडणाऱ्यांवर कडक कारवाई सुरु

अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल गंगोत्री बार सील 

नाशिक – नाशिक शहरात कोरोनचे प्रमाण वाढते चिंताजनक आहे.प्रशासनाने अनेकवेळा सूचना देऊनही अनेक जण सर्रास निर्बंध तोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शहरातील पोलीस (Nashik police) अधिकाऱ्यांसह पोलीस फोर्स रस्त्यावर उतरली आणि  नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.शासनाकडून प्राप्त सूचनेनुसार व प्रशासनाने निर्गमित केलेल्या निर्देशानुसार आज होलिकात्सवा दरम्यान नियमांचे काटेकोर पणे पालन या साठी सर्वच पोलिसस्टेशन हद्दीतील पोलीस रस्त्यावर उतरून निगराणी ठेवली गेली. 

पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय  यांच्या नेतृत्वाखालीपरिमंडळ-१ मध्ये पोलीस उपायुक्त अमोल तांबे, आणि परिमंडळ-२ मध्ये पोलीस उपायुक्त विजय खरात, यांच्या  मार्गदर्शनाखाली तसेच श्री संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली,गुन्हे शाखेच्या व विशेष शाखेच्या साध्या कपड्यातील अधिकारी व आंमलदारांनी तसेच श्रीमती पौर्णिमा चौगुले-श्रिंगी यांचे अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन (Nashik police)हद्दीत नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी पेट्रोलिंग ठेवण्यात आली.होळी सणानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासनाचे निर्बंध पाळले जातील याबाबत पूर्णतः दक्षता घेण्यात आली. ज्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन होईल अशा इसमांवर कारवाई करण्यात आली. 

भद्रकाली परिसरात पोलिसांचे रूट मार्च 

भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत शब ए बारात, होळी व आगामी सण-उत्सव याचे अनुषंगाने माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-2,श्रीमती दिपाली खन्ना यांचे उपस्थितीत पाई रूट मार्च घेण्यात आला .रूट मार्च करिता  भद्रकाली पोलीस स्टेशन (Nashik police)येथे एकूण १२ पोलिस अधिकारी ,६१ पोलीस अंमलदार, १० होमगार्ड , तसेच झोन वन स्त्र्याकिंग,  आरसीबी प्लाटून, निर्भया पथक ,एस आर पी प्लाटून, हे उपस्थित होते.   

नाशिकरोड परिसरात नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई  

नाशिकरोड पोलीस स्टेशन (Nashik police) हद्दीमध्ये नियम न पाळणाऱ्यांवर मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली.सपोआ विभाग चार चे शेखसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळ्या टीम करून स्टेशन परिसर  व जेलरोड परिसरात करण्यात आली, त्यामध्ये पी ए सिस्टीम द्वारे लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यात आली. सोशल डिस्टंसिंग साठी दुकाना समोर चौकोन/ गोल आखून  घेणे  विषयी कळविले त्याप्रमाणे कांही दुकानदारांनी लगेच  मार्किंग करून घेतली. कारवाई दरम्यान महानगरपालिके तर्फे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ३जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.मास्क न घालणाऱ्या १७ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३४०० रुपयांचा दंड केला गेला.मार्गदर्शक सुचने नुसार शनिवार व रविवार दुकान बंद ठेवण्याचे आदेश असतांना देखील ५ दुकानदारांनी आपली दुकाने सुरु ठेवल्याचे निदर्शनास आल्या नंतर त्यांच्या कडून प्रत्येकी ५ हजार असे एकूण २५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन केल्या प्रकरणी ५ हजार रुपये दंड करण्यात आला 

तसेच पोलीस प्रशासनाने (Nashik police) विना मास्क फिरणाऱ्या ६ जणांना प्रत्येकी २०० असा १२०० रुपयांचा दंड केला. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला १००० रुपये दंड केला.सोशल डिस्टंसिंग न पाळणे २ केसेस १००००/- रुपये दंड असे एकूण नऊ केसेस १२२०० रुपये दंड करण्यात आला.  

अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल गंगोत्री बार सील   

अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल गंगोत्री बार सायखेडकर हॉस्पिटल कामटवाडे या ठिकाणी मा पोलीस उप आयुक्त श्री विजय खरात नाशिक शहर यांच्या  सूचनेनुसार मा सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक नखाते विभाग ३ नाशिक शहर पोलीस निरीक्षक गुन्हे श्री कमलाकर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश शिंदे गुन्हे शोध पथक व अंबड पोलीस स्टेशन कडील पोलीस अमलदार असे नाशिक महानगरपालिका यांच्यासोबत हॉटेल गंगोत्री बार मधील १९ लोकांवर पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारणी करण्यात आली व सदर हॉटेल गंगोत्री बार हे पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे. 

तसेच अंबड पोलीस स्टेशन हद्दीत मनपा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या (Nashik police) वतीने शिवाजी चौक पवन नगर त्रिमूर्ती चौक माऊली लॉन्स परिसरात  विना मास्क फिरणार्‍या लोकांवर कारवाई तसेच आस्थापनांवर करण्यात आली सदर कारवाई दरम्यान  ४१ जणांवर कारवाई करून ३०५०० रुपये दंड आकारणी करण्यात आली.