सर्वात वर

शहरातील आर.के.परिसरात ड्रोनद्वारे सॅनिटायझर फवारणी

खा. गोडसे यांच्या पुढाकाराने प्रायोगिक तत्त्वावर मोहिमेला प्रारंभ

नाशिक – शहरातील वाढती रुग्णसख्या आटोक्यात आणण्यासाठी निबंध लागू करण्यात आले आहे वाढत्या लोकसंख्येची खासदार हेमत गोडसे यानी गभीर दखल घेत उपाययोजनाचा एक भाग म्हणून शहरात ड्रोनद्वारे हायपोक्लोराईड सॅनिटायझरची फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे . हायपोक्लोराईड सॅनिटायझर किती प्रभावी आहे याची चाचपणी करण्यासाठी आज खा गोडसे यांनी ड्रोनद्वारे हायपोक्लोराईड सॅनिटायझर फवारणीला प्रायोगिक तत्वावर रविवार कारजा येथून प्रारंभ केला .

शहरातील मुख्य रहदारीचा चौक असलेल्या रविवार कारंजा परिसरात बुधवारी (दि.१२) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास खासदार गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ड्रोनद्वारे फवारणीला (Sanitizer Spraying) सुरुवात करण्यात आली. बंगलोर येथील गरुडा ऐरोस्पेसच्या माध्यमातून ही फवारणी करण्यात येत आहे. या ड्रोनच्या माध्यमातून शहरातील तेरा मुख्य झोनमध्ये हायपोक्लोराईड  सॅनिटायझरची फवारणी (Sanitizer Spraying) करण्यात येणार आहे. खासदार गोडसे यांच्या संकल्पेतून ही मोहिम राबविण्यात येत असून त्यांनी गेल्या पंधरवाड्यात गरुडा ऐरोस्पेसचे मुख्य अधिकारी अग्निश्वर जयप्रकाश यांच्याशी नाशिक शहरात ड्रोनद्वारे फवारणी संदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर त्यांच्या पथकाकडून या मोहिमेला प्रयोगिक तत्त्वावर रविवार कारंजा परिसरात सुरुवात करण्यात आली. 

यावेळी खासदार गोडसे यांच्यासह माजी महापौर विनायक पांडे, सचिन बांडे, नाना काळे, राजेंद्र नानकर, संजय चिंचोरे, पप्पू टिळे, वैभव खैरे, संतोष ठाकुर, विजय काकड, शाम कांगले, राजेंद्र शिरसागर, राजू राठोड, मयुर जुन्नरे, प्रदीप कोठुळे, शुभम करमासे, बिट्यु बनकर आदींसह कायर्कर्ते उपस्थित होते.

सदर फवारणीची मोहिम गरूडा अॅरोस्पेस या कंपनीचे पायलट बानुप्रकाश के.बी. , श्रेषराज ए . यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रायोगिक फवारणी मोहिम सुमारे अर्ध्या तासाची होती . या ड्रोनमध्ये एकाचवेळी सुमारे बारा लिटर सोडियम हायपोक्लोराईड इतक्या सॉनेटायझर (Sanitizer Spraying)औषधाची क्षमता आहे . खासदार गोडसे यांच्या या अभिनव उपक्रमाची शहरवासियाकडून कौतुक होत आहे .