सर्वात वर

नासिकचा सराफ बाजार आता मंगळवारीही सुरू रहणार

दि नासिक  सराफ असोसिएशनचा  निर्णय

नाशिक – नाशिक शहरात मध्ये  कोवीड रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने लावण्यात आलेल्या कोवीड नियमावलीला दि नासिक सराफ असोसिएशनने १०० टक्के प्रतीसाद देणार असल्याचे जाहीर केले आहे. 

दरम्यान या सर्व पार्श्वभुमीवर मंगळवारची साप्ताहिक सुट्टी रद्द करून सोमवार ते शुक्रवार सलग पाच दिवस प्रशासनाने नमूद केलेल्या वेळेत नासिक सराफ बाजार (Nashik Saraf Bazar) सुरू राहणार आहे. नव्या नियमावलीत शनिवार व रविवार दिवसभर व्यावसायीक दुकाने  बंद ठेवण्याचा नियम स्थानिक प्रशासनाने दिला आहे. त्यातच मंगळवारची साप्ताहिक सुटी अश्या परिस्थितीत आठवड्यातील तिन दिवस बाजार बंद राहिल्यास सराफ व्यावसायीकांना याचा आर्थिक फटका बसू शकतो तर दुसरीकडे ग्राहकांचीही सोने खरेदीसाठी गैरसोय होणार आहे. 

ही परिस्थिती लक्षात घेऊन  मंगळवारीही सराफ बाजार (Nashik Saraf Bazar) सुरू ठेवण्याचा निर्णय नासिक सराफ असोसिएशनने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष गिरीश नवसे, सेक्रेटरी किशोर वडनेरे, उपाध्यक्ष मेहूल थोरात यांनी दिली आहे.