सर्वात वर

Nashik : शिवसेना महानगरप्रमुखपदी सुधाकर बडगुजर

नाशिकच्या(Nashik) शिवसेना महानगर प्रमुखपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून तसे जाहीर करण्यात आले आहे.येणाऱ्या महापालिका निवडणुकीची तयारी करण्यासाठी बडगुजर यांच्याकडे महानगराची जवाबदारी सोपवली असल्याचे सांगण्यात येत आहे.येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या (Nashik) महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेत मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे.

काही दिवसापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी संघटनेत फेरबदल होऊ शकतो असे असे संकेत दिले होते.आगामी महानगर पालिका निवडणूक महाविकास आघाडी लढणार असण्याचे संकेत खा.राऊत यांनी दिले होते.त्यात नाशिकचा महापौर शिवसेनेचाच होणार असे स्पष्ट सांगितले होते.

नाशिक महानगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच

संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढत आहे त्यामुळे नाशिक महापालिकेचा महापौर शिवसेनेचाच असेल,असा दावा देखील खा.राऊत यांनी केलाआहे.त्यामुळे आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.