सर्वात वर

Nashik : वालदेवी धरणात सहाजण बुडाले

नाशिक – नाशिक शहरातील सिडकोतील सिंहस्थनगर परिसरातील मुले वालदेवी धरण (Valdevi Dam) परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले असता ६ जण नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये पाच मुली तर एका मुलाचा समावेश आहे.एका मुलीचा मृतदेह हाती लागलाअसून अन्य पाच जण बेपत्ता आहे त्यांचा शोध सुरु आहे.सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हि घटना घडली 

मिळालेल्या माहिती नुसार सिंहस्थनगर नगरमधील नऊ जण वाढदिवस साजरा करण्यासाठी आज शुक्रवारी वालदेवी धरण (Valdevi Dam) परिसरात गेले असता सर्वजण फोटो काढण्यासाठी उभे होते त्यावेळी काहीजणांचा तोल गेल्याने ते पाण्यामध्ये पडले त्यांना वाचवण्यासाठी काही जणांनी पाण्यात उडी घेतली पोहता येत नसल्याने सहा जण पाण्यात बुडाले. ७ वाजे नंतर अंधार झाला असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. घटनास्थळी वाढीवऱ्हे पोलीस,अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर दाखल झाल्या असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्यसुरु आहे.