सर्वात वर

Nashik : आज जिल्ह्यात २०० तर शहरात १५० कोरोनाचे नवे रुग्ण

बातमीच्या वर

२४ तासात १८५कोरोना मुक्त तर ६१८ संशयित दाखल  :४ जणांचा मृत्यू:जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.२९ %

नाशिक (प्रतिनिधी)आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे २०० नवे रुग्ण आढळले आहेत तर शहरात  कोरोनाचे १५० नवे रुग्ण आढळले.आज कोरोना मुळे जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२९ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९५ .८७ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात १८५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण ६१८ कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २८१२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १७४५ जण उपचार घेत आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.३१,टक्के, नाशिक शहरात ९५.८७ टक्के, मालेगाव मध्ये  ९३.२९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.२५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.२९  इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात आज १५० जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ५६६ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६३,४६३ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६०,८४० जण कोरोना मुक्त झाले असून १७४५ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) गौरी रो हाऊस क्र १,स्वामी विवेकानंद नगर,सिडको नाशिक येथील ५८ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.

२) फ्लोरा हाइट्स ए- ३०४, अमृतधाम ,पंचवटी येथील ६६ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०४

नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७११

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८७८

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०३

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -५७९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०२

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१२

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २२

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ६७५

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

https://janasthan.com/wp-content/uploads/2020/11/AGE-SEX-TEMPLATE-10-NOV-20.pdf
बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली