
Nashik :नवीन बिटको हॉस्पिटल मध्ये शॉर्टसर्किटमुळे व्हेंटिलेटरला आग
डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे रुग्णालयातील सर्व रुग्ण सुखरूप
नाशिक – नाशिकरोड येथील नाशिक महानगर पालिकेच्या बिटको हॉस्पिटल (New Bytco Hospital) कोविड सेंटर मध्ये शॉर्ट सर्किटने व्हेंटिलेटर जळाल्याची घटना घडली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वैद्यकीय अधिकारी जितेंद्र धनेश्वर यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिकेच्या बिटको हॉस्पिटल मधील आय.सी.यु.कक्षातील १६ व्हेंटिलेटर असून त्यापैकी एक व्हेंटिलेटर अतिगरम झाल्याने त्यातून धूर निघाला त्यामुळे तेथील एकूण ५ व्हेंटिलेटर बंद पडले हे लक्षात आल्यावर त्वरित याच कक्षातील रुग्ण सेवक व डॉक्टर यांनी व्हेंटिलेटर असणार्या रूग्णांना ऑक्सीजनवर घेऊन स्टँबीलाईझ केले व त्वरीत बंद झालेले व्हेंटिलेटर व इतर ४ व्हेंटिलेटर एक एक करून सुरू केले असून त्यावरील रुग्ण स्थिर असल्याची माहिती मनपा आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.
सायंकाळी ७:३० च्या सुमारास हा प्रकार घडला असून येथे कोरोनावर उपचार घेण्यासाठी मोठ्याप्रमाणावर रुग्ण दाखल आहेत.