सर्वात वर

Nashik : ज्येष्ठ तबला वादक नवीन तांबट यांचे निधन

बातमीच्या वर

नाशिक – ज्येष्ठ तबला वादक ,आणि पेठे हायस्कूलचे निवृत्त शिक्षक ,जनस्थान ग्रुपचे आयकॉन नवीन तांबट यांचे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. काही दिवसापूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर उपचारासाठी  ते कोव्हीड सेंटर मध्ये दाखल झाले . तिथे हि त्यांना बरे वाटत नसल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. काही दिवसा पूर्वी त्यांची प्रकृती अधिकच खालवल्या मुळे त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती.आज त्यांनी सकाळी ८ वाजता अखेरचा श्वास घेतला. 

नवीन तांबट यांनी अनेक दिग्गज कलावंतांना साथ संगत केली होती त्यात प्रामुख्याने संगीतकार अनिल मोहिले , संगीतकार श्रीनिवास खळे  यांच्या अनेक कार्यक्रमात नवीन तांबट तबल्यावर साथसंगत करत होते. पेठे विद्यालयातून ते क्राफ्ट टीचर म्हणून निवृत्त झाले होते.नाशिक एज्युकेशन सोसाटीच्या पालक शिक्षक संघाचे ते विद्यमान सदस्य होते.त्यांच्या निधनाने नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा तांबट,मुलगा निनाद तांबट,सून आणि मुलगी, आणि पुतणे असा परिवार आहे. 

श्रद्धांजली !
ज्येष्ठ तबला वादक आणि पेठे हायस्कूलचे निवृत्त शिक्षक नवीन तांबट यांचे दु:खद  निधन झाले. नवीन तांबट यांनी प्रामुख्याने संगीतकार अनिल मोहिले, संगीतकार श्रीनिवास खळे यांच्यासह दिग्गज कलावंतांना साथ संगत केली होती. पेठे विद्यालयातून ते क्राफ्ट टीचर म्हणून निवृत्त झाले होते. नाशिक एज्युकेशन सोसाटीच्या पालक शिक्षक संघाचे ते विद्यमान सदस्य होते. त्यांच्या निधनाने नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रातील संगीत क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय तांबट कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच पार्थना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली !

छगन भुजबळ

मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य.

______________

नवीन तांबट(सर)

नवीन तांबट सर म्हणजे शांत, संयमी आणि हसतमुख, विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण नाते जोडून त्यांच्यात अभ्यासाविषयी रूची निर्माण करणे ही सरांची खासियत होती. त्यामुळेच अनेक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे कौशल्य तांबट सरांकडे होते.सर तबला उत्तम वाजवत. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी कला व संगीताविषयी आवड निर्माण केली.विद्यार्थ्यांना घडवणारा व आयुष्याला आकार देणारे तांबट सर माजी विद्यार्थ्यांनाही कायम हवेसे वाटत राहिले.‘करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे शिक्षण व संस्काराचे महत्त्व साने गुरूजींनी सांगितले आहे ते तांबट सरांनाही लागू होते.तांबट सर गुरू असूनही विद्यार्थ्यांशी मित्र म्हणूनच वागत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची आदरयुक्त भिती वाटे. आणि तीस वर्षानंतरही ते अनेकांना नावानिशी ओळखत असत. सुख:, दु:खाविषयी जाणून घेत असत. हा माणुसकीचा, आपलेपणाचा स्वभाव त्यांनी शेवटपर्यंत जपला.ज्ञानयुक्त संस्कारांचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी दिला. समाजात चांगला माणूस घडवण्याचं मौलिक कार्य तांबट सरांनी केले. तोच वसा आणि वारसा नव्या पिढीपर्यंत नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.अशा गुरूला भावपूर्ण श्रद्धांजली.

विश्वास जयदेव ठाकूर

(संस्थापक अध्यक्ष)विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक

पेठे हायस्कूलचे निवृत्त शिक्षक आणि ज्येष्ठ तबला वादक नवीन तांबट सर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष अंकुश पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली.  

नाशिक : पेठे हायस्कूलचे निवृत्त क्राफ्ट शिक्षक, नाशिक एज्युकेशन सोसाटीच्या पालक शिक्षक संघाचे विद्यमान सदस्य आणि ज्येष्ठ तबला वादक नवीन तांबट सर यांचे दु:खद  निधन झाले आहे. आपल्या शांत, संयमी आणि हसतमुख स्वभावामुळे अत्यंत विध्यार्थीप्रिय असलेल्या तांबट सरांनी विध्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच कला व संगीतामध्ये रुची निर्माण करून मातीला हळुवारपणे आकार देणाऱ्या कसबी कलाकाराप्रमाणे अनेक कलाप्रिय विद्यार्थी घडवले. जाणकार गुरु व प्रसंगी मित्र म्हणून वागत त्यांच्याकडे असलेले माणुसकी व आपलेपणाचे संस्कार त्यांनी आपल्या विध्यार्थांमध्ये हळुवारपणे रुजवले. अनेक वर्षांनी भेटणाऱ्या विध्यार्थांनाही नावाने हाक मारून, त्यांची आस्थेने विचारपूस करीत आपल्या वागण्यातून त्यांनी आपला ज्ञानयुक्त संस्कारांचा वसा आपल्या विध्यार्थांना देत एक संस्कारक्षम पिढी घडवली. ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले, संगीतकार श्रीनिवास खळे यांच्यासह अनेक दिग्गज कलावंतांना तबल्यावर साथ-संगत करणाऱ्या नवीन तांबट सरांच्या दुःखद निधनाने नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक व संगीत क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष अंकुश पवारयांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व व्यक्तीशः स्वतःतर्फे नवीन तांबट सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली