सर्वात वर

नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल मधील ६ विद्यार्थांना कोरोनाची लागण

नाशिक – नाशिक मधील भोसला मिलिटरी स्कूल मधील ६ विद्यार्थांना कोरोनाची (Corona Positive) लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याची माहिती लपविल्या मुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागा तर्फे शाळेस नोटीस बजावली आहे. 

भोसला मिलिटरी स्कूलच्या वसतिगृहातील ६ विद्यार्थ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत. त्यामुळे तेथील ५१ विद्यार्थी व शिक्षकांची हि कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट रात्री उशिरा पर्यंत येणार असल्याचे समजते आहे. ६ विद्यार्थ्यां पैकी एका विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २ विद्यार्थ्यांना शाळेतच आयसोलेशन मध्ये ठेवले आहे. तीन विद्यार्थाना त्यांचे पालक घेऊन गेले असल्याचे निदर्शनास आले आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली