सर्वात वर

“नाट्यरसिक” एकांकिका महोत्सवाचे २९ जानेवारीला आयोजन

Nashik News : नाट्यरसिकचे सदस्य लेखक कै.नरेंद्र विश्वनाथ सोनवणे यांना हा महोत्सव समर्पित

नाशिक : (Nashik News Update) कोरोनामुळे ऑनलाईन चालणाऱ्या तालमींमधून तयार झालेल्या एकांकिकांचे ऑफलाईन सादरीकरण असे वैशिष्ट्य असलेला नाट्यमहोत्सव यंदा नाट्यरसिक ग्रुप सादर करणार आहेत. निमित्त आहे नाट्यरसिक एकांकिका महोत्सव २०२०-२१ चे नाट्यरसिक आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या नाट्यरसिक एकांकिका महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी (दि.२४) झालेल्या नियोजन बैठकीत रंगमंच समितीच्यावतीने सर्व कामकाजाचे वाटप व पूर्तता याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी नाट्यरसिक ग्रुपचे संचालक श्रीराम वाघमारे यांनी ही माहिती दिली. महोत्सव दि.२९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत कालिदास कलामंदीर येथे होणार आहे. 

वाघमारे यांनी सांगितले की, नाट्यरसिक हा नव्या जुन्या कलावंतांचा समूह गेल्या चार वर्षांपासुन नाशिकच्या  नाट्यक्षेत्रात सक्रिय आहे. ग्रुपच्यावतीने दरवर्षी एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा नाट्यरसिकचे सदस्य असलेले लेखक कै. नरेंद्र विश्वनाथ सोनवणे यांना हा महोत्सव समर्पित करण्यात येणार आहे. नाशिक मधील विविध नाट्यसंस्थांमधील कलाकार या निमित्ताने एकसंघ होऊन या महोत्सवाचे आयोजन करत आहेत. सध्या सुरू असलेली लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील कलाकार पुनम पाटील व उमेश दामले यांनी साकारलेली एकांकिका या महोत्सवात विशेष आकर्षण ठरणार आहे.  

लेखन, दिग्दर्शन, अभिनय, अन्य तांत्रिक बाजु या जवाबदाऱ्या ग्रुपमधील सदस्यच पार पाडतात, हे या महोत्सवाचे वेगळेपण. आजवर अनेक नवोदितांना याद्वारे संधी मिळुन आज ते मुख्य प्रवाहात कार्यरत आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महोत्सव होऊ शकला नाही. रसिक प्रेक्षकांनी हा महोत्सव याची डोळा याची देही विनामूल्य अनुभवावा असे आवाहन  संयोजकांतर्फे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष रविंद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनिल ढगे, सहकार्यवाह राजेश जाधव यांनी केले आहे.

सदस्य नियामक मंडळ, अखिल भारतीय नाट्यपरिषद, सदस्य व्रुध्द कलावंत मानधन समिती, सदस्य, अनुदान समिती, अध्यक्ष, बालरंगभुमी, नाशिक श्री सचिन शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महोत्सव यशस्वीतेसाठी ईश्वर जगताप, महेंद चौधरी, मुकेश काळे, महेश खैरनार, जयदीप पवार, कविता आहेर, मोहिनी भगरे, मिलिंद तारे, वैभव काळे, भुषण भावसार, रोहित सोनार, डॉ. मुरलीधर भावसार, डॉ मोहन अमेसर, अनघा धोडपकर, केतकी कुलकर्णी, श्रुती भावसार, सिध्दी बोरसे, अश्विनी कासार, प्रशांत गरूड, वैभवी सुलक्षणे, दुर्वाक्षी पाटील, कावेरी जगताप, दीप्ती भालेराव, चारूलता जगताप इत्यादी प्रयत्नशील आहेत. याशिवाय वैभवी चव्हाण, प्रणेता भाटकर, नेहा निमगुळकर, अविनाश खेडकर, नितीन साळुंके, नेहा दीक्षित, शुभम धांडे, रश्मी वरखेडे, पलाश खैरनार, प्रांजल सोनवणे, अनिता सोनवणे, प्रतिक जोशी, स्रुष्टी शिरवाडकर, पुजा सोनार, रविराज वरखेडे, स्नेहल काळे, अश्विनी वाघ इत्यादी कलाकारांच्या यात भुमिका असणार आहेत 

महोत्सवात सादर होणाऱ्या एकांकिका 

१. बासुंदी :
लेखिक : कै नरेंद्र विश्वनाथ सोनवणे
दिग्दर्शक : महेश खैरनार

२. मृगजळ :लेखक : श्रीराम वाघमारे
दिग्दर्शक : मुकेश काळे

३. सेम टु सेम :
लेखक : कल्पेश कुलकर्णी
दिग्दर्शक : महेंद्र चौधरी

४. दुकान कुणी मांडु नये :
लेखक : संजय पवार
दिग्दर्शिका : पुनम पाटील 

(Nashik News)