सर्वात वर

नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी हवामान साक्षर होण्याची गरज ….!

बातमीच्या वर

हवामान अभ्यासक राहुल रमेश पाटील यांचे  मत…!

Rahul Ramesh Patil
हवामान अभ्यासक राहुल रमेश पाटील

सांगली-मोसमी पावसाची पडण्याची पध्दत,एकूण पाऊसमान, एकूण पाऊसकाळ या मुख्य घटकांमध्ये अलीकडील ३-४ वर्षांत जाणवण्या इतपत बदल झाल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक ह्या बदलास,सुक्ष्म स्वरुपात चालू दशकाच्या अगोदर पासून सुरवात झालेली आहे.परंतु हे बदल सुक्ष्म असल्याने फारसे जाणवले नाहीत.मात्र हे बदल गेल्या तीन चार वर्षापासून प्रकर्षाने जाणवण्यास सुरवात झाली आहे.या बदलामुळे अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना आपल्याला करावा लागत आहे. त्याचमुळे नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी हवामान साक्षर होण्याची गरज आहे असे परखड मत हवामान अभ्यासक राहुल रमेश पाटील याची व्यक्त केले आहे. 

जागतिक स्तरावरील पर्यावरण,तापमान,हरीतगृह परिणाम याचा एकत्रित परिणामस्वरुप सध्याचा बदल होऊ घातला आहे.भविष्काळातही थोड्याफार फरकाने हा बदल अशाच स्वरुपात राहाणार आहे. हा होऊ घातलेला वा होत असलेला बदल,गेल्या साठ सत्तर वर्षात मोसमी पावसाच्या संदर्भाने प्रस्थापित झालेल्या विविध घटकांवर विपरीत परिणाम करणारा ठरणार आहे.

यासंदर्भात ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ ( IPCC ) या यूनो संलग्न असलेल्या आणि 85 देशातील 830 तज्ञांनी सन 2013 व 2014 मध्ये जाहिर केलेल्या पाचव्या अहवालात ( AR5 ) 1950 पासून ते 2100 पर्यंत बदलत जाणाऱ्या( Trend ) तापमान, पाऊसमान, समुद्र पातळी,हिमाच्छादन, कार्बन उत्सर्जन, पिके, टोकाच्या (Extreme) पावसामुळे होणारी हानी, जीवनमान /आरोग्य यासारख्या काही महत्त्वाच्या बाबी संदर्भातील बदलाचे सुतोवाच ठळकपणे नमुद केलेले आहेत.
दक्षिण आशिया संदर्भात IPCC ने या बदलाचा परामर्श घेऊन, निरिक्षणाचे आधारे नमुद केलेल्या बाबी, आपण खरेतर अलिकडील तिन चार वर्षांत कमी जास्त प्रमाणात अनुभवत आहोत.महत्वाची बाब म्हणजे गेल्या साठ सत्तर वर्षापासून सेट झालेल्या मोसमी पावसाच्या विविध अंगात आमुलाग्र बदल होत आहेत किंवा होऊ घातले आहेत आणि वर्षांगणिक कमी जास्त स्वरुपात त्याची धग दखलपात्र होत आहे.

पुर्वी पावसाळा हिवाळा उन्हाळा या ठळक असलेल्या ऋतूच्या सिमारेषा अंधुक होत जाणार आहेत. पुर्वी जून 20 टक्के, जुलै 30 टक्के, आॅगस्ट 30 टक्के आणि सप्टेंबर 20 टक्के असे सर्वसाधारणपणे पावसाचे वितरण असायचे आणि आपण ते अनुभवले आहे.’नेमेची येतो मग पावसाळा’ अशी साहित्यविश्वात नोंद होण्या इतपत नियमितपणा, मोसमी पावसाने निर्माण केला होता.कधी तरी वळवाचा/अवकाळी /वादळी पाऊस पडायचा.आता येत्या काळात नेहमीच्या मोसमी पावसाऐवजी  ज्याला आपण बिगरमोसमी /वळवाचा/अवकाळी /वादळी पाऊस म्हणतो याचाच जास्त प्रभाव राहाणार आहे.अर्थातच त्या अनुषंगाने नुकसानीला सामोरे जावे लागेल हे ओघाने आलेच.

पुर्वापार चालत आलेल्या चक्रीय वादळांच्या संखेत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ती वर्षभरात केंव्हाही होणार  आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील तापमानाचे पट्ट्यात बदल होत आहेत तसेच पृथ्वीवरील सेट झालेल्या वाऱ्यांच्या दिशेतही बदल होत असुन नव्या दिशेत ते सेट होणार आहेत.

त्याचा परिणाम म्हणून जादा पावसाच्या प्रदेशातील (चेरापुंजी सारखे अव्वल पावसाचे ठिकाण) पाऊसमान घटून कमी पावसाच्या अवर्षणग्रस्त वा दुष्काळी /वाळवंटी(आफ्रिकेतील सहारा, राजस्थान व परिसरातील थरचा वाळवंटी भाग) भागात पाऊसमान जादा राहाणार आहे.
पाऊसाची झड लागणे, सर्वदुर पाऊस पडणे, पाउस लागुन राहणे हे पावसाचे पुर्वीचे गुणधर्म गायब होणार असुन एक दोन तासात क्युमीलोनिंबस काळ्याकुट्ट ढगांनी आकाश भरले जाऊन ‘मूसळ’धार (अक्षरशः) /ढगफुटी गडगडाटी पाऊस पडणे या स्वरुपात होणार आहे.असे हि राहुल पाटील यांनी सांगितले 

कमी वेळात जादा पाऊस झाल्याने वारंवार पुरस्थिती येण्याच्या घटनात वाढ होईल.यामुळे अर्थातच पिकहानी, जिवितहानी, महापूर, जमीन वाहुन जाणे, रस्ते, पुल, बंधारे फुटणे यात वाढ होत जाणार आहे.दक्षिण आशियात समाविष्ट असलेले व मोसमी पाऊस पडणारे देश भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश , नेपाळ, भुतान, मालदिव हे जास्त प्रभावीत होणार आहेत.
भारताच्या बाबतीत आंध्र, तेलंगणा,महाराष्ट्र,छत्तीसगड, मध्यप्रदेश,गुजरात व राजस्थान ही राज्ये जादा प्रभावीत होणार आहेत.या बदलत्या बदलास अनुरुप होण्यासाठी आपणाला पुर्वापार चालत आलेली शेती मशागत, पेरणी, काढणी, पिक पध्दती आणि शेती कामाचे वेळापत्रक याबरोबरच छोटे, मध्यम वा मोठे या सर्व बंधाऱ्यांचे संकल्पन व बांधणी यात मुळातून फेरबदल करावे लागतील.सध्याच्या पिक पध्दतीत बदल करुन वादळी वारे, मुसळधार / ढगफुटीचा / धुंवाधार व वर्षाच्या कोणत्याही काळात पडणारा जादा पाऊस / जोडीला चक्रीय वादळे या साऱ्यांपुढे तग धरणाऱ्या पिकांकडे जावेच लागेल.

पॅसिफिक महासागराच्या पुर्वेकडे आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या पेरु चिली या देशांच्या पश्चिम किनाऱ्यानजीक निर्माण होत असलेल्या ‘एल’ निनोच्या (म्हणजे आपल्याकडे कमी पाऊस) संखेत घट होऊन  ‘ला’ निनोचे (म्हणजे आपल्याकडे जादा पाऊस) प्रमाण वाढते राहील.मोसमी आणि चक्रीय वादळे या दोन्ही मूळे पाऊसमान जादा राहणार आहे.आपण जर या बदलास अनुरुप बदल केले नाही तर,मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत राहील हे मात्र निश्चित.असे हि हवामान साक्षरता” या संकल्पनेचे खंदे पुरस्कर्ते राहुल पाटील यांचे मत आहे,

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली