सर्वात वर

वृत्तपत्र विक्रेतेही लढवणार महापालिकेची निवडणूक

 नाशिक (प्रतिनिधी) – उन्हाळा .. असो .. कडाक्याची थंडी असो.. कि पावसाळा असो .. प्रत्येकाच्या घराघरात सकाळी सकाळी वृत्तपत्र पोहचवणारे वृत्तपत्र विक्रेते आता महापालिका निवणूक लढवणार आहेत. सर्व सामान्य माणसाशी हे वृत्तपत्र विक्रेते नकळत जोडले गेले आहे. सकाळी सकाळी असंख्य घरात फिरून अनेक परिसरातील समस्यांचा अभ्यास या वृत्तपत्र विक्रेत्यांना असतो. याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिकेची (Municipal Elections) येणारी निवडणूक हे वृत्तपत्र विक्रेते लढवणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी जनस्थानशी बोलतांना दिली. 

नाशिक मधून महानगर पालिका निवडणुकीसाठी (Municipal Elections) सिडको,सातपूर,नाशिक आणि नाशिकरोड या विभागातून प्रत्येकी २ वृत्तपत्र विक्रेते बांधव आणि ४ महिला वृत्तपत्र विक्रेता भगिनी यांना उमेदवारी देण्याचा मानस असून,तळागाळातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देण्याचा आमचा मानस आहे. सुरुवातीला नाशिक महानगर पालिका क्षेत्रात १२ वृत्तपत्र विक्रेते निवडणूक लढणार असल्याचे  ही जितेंद्र भावे यांनी सांगितले.