सर्वात वर
AC Ad

नववी – अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

बातमीच्या वर

 
मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती  दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून  नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार आहे.  त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाचा निर्णय घेणार आहे.  ,या आधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय होणार याबाबत अद्यापही विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे.दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असून या परीक्षांचे वेळापत्रका बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील एक दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे समजते आहे. 

बातमीच्या मध्ये
Ac square