सर्वात वर

१८ ते ४४ वयोगटातील लस घेणाऱ्या नागरीकांसाठी महापालिकेने केल्या महत्वाच्या सूचना

कसे कराल रजिस्ट्रेशन : कोण कोणत्या केंद्रावर मिळणार लस 

नाशिक – राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे नाशिक महानगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना  १ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण (Vaccination) करण्यात चालू करण्यात आले आहे. यासाठी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी  करणे आवश्यक आहे . लसीकरण केंद्रावरती कोणालाही नाव नोंदणी करून लस घेता येणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन नाशिक महानगर पालिकेतर्फ़े करण्यात आले आहे. 

लसीकरणासाठी (Vaccination) नाव नोंदणी करत असताना जे कागदपत्र अपलोड केली असतील त्यापैकी १ आय डी प्रूफ म्हणून सोबत घेऊन जाणे बंधनकारक आहे. खालील लसीकरण केंद्रावर १ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी सुरु झाली आहे . 

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात पुढील प्रमाणे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत

कोविशील्ड लस पुढील २ केंद्र वरती देण्यात येत आहे 

१) इंदिरागांधी हॉस्पिटल पंचवटी कारंजा 

२) नाशिकरोड शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र खोले मळा 

कोवॅक्सिन लस पुढील ३ केंद्र वरती दिली जाणार आहे. 

१)मायको दवाखाना, पंचवटी 

२) मायको सातपूर,मनपा विभागीय कार्यालया मागे 

३)सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,अचानक चौक येथे लसीकरण सुरु होणार आहे 

तरी वरील लसीकरण केंद्रवर  सकाळी १० ते ४ वेळेत लसीकरण (Vaccination) सुरु राहणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील  नागरिकांनी  आदल्या  दिवशीच  लसीकरणाची नोंदणी सायंकाळी ७ ते १० यावेळेत केल्यास नोंदणी करता येऊ शकेल. लसीकरणाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा  असे आवाहन  नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करू नये. जेणे करून कोविड संसर्ग वाढू नये.