सर्वात वर

नाशिक शहरात शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही

नाशिक – नाशिक महानगर पालिकेच्या गंगापूर धरण तसेच  मुकणे धरण रॉवॉटर पंपींग स्टेशन केंद्रांवरील महावितरण कडुन ओव्हरहेड लाईनची पावसाळापुर्व कामे करायची असल्याने  मनपाचे   गंगापुर धरण व मुकणे धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहराला  २२ मे २०२१ रोजी  होणारा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा (Water Supply)होणार नाही तसेच दि. २३ मे  रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नाशिक नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.