सर्वात वर
AC Ad

नाशिक महानगर पालिकेतर्फे दोन खाजगी हॉस्पिटलला नोटीसा

बातमीच्या वर

सी बी आर एस प्रणाली न राबविल्यास हॉस्पिटल वर गुन्हा दाखल करणार

नाशिक – नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयांनी सी बी आर एस कार्यप्रणालीत(CBRS system) भरती रुग्णांची नोंद वेळोवेळी न केल्या प्रकरणी दोन खाजगी रुग्णालयांना महानगर पालिकेतर्फे (Nashik Municipal Corporation) नोटिसा देण्यात आल्या असल्याची माहिती मा.अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिली.

काल  रविवार (दि ५ एप्रिल)  सायंकाळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांचेसह सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे व सी बी आर एस सिस्टिमचे अजय अहिरे या पथकाने  अचानक मेडीलिव्ह हॉस्पिटल व न्यू आधार हॉस्पिटल या २ रुग्णालयांची पाहणी केली. त्यात नाशिक महानगर पालिके (Nashik Municipal Corporation) तर्फे सी बी आर एस (CBRS system) कार्यप्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून असे निदर्शनास आले  की खाजगी रुग्णालय सीबीआर ए सिस्टीम मध्ये भरती रुग्णांची नोंद वेळोवेळी करत नाहीत.या सिस्टीमवर बेड रिकामा आहे असे दिसते परंतु वस्तुस्थिती मध्ये या बेडवर रुग्ण भरती असतो. यामुळे नवीन कोरोना रुग्णांना भरती करणे कामी असंख्य  अडचणी निर्माण होतात.

या हॉस्पिटल मध्ये पाहणीत केली तेव्हा भरती रुग्णांची नोंद वेळोवेळी न केल्याचे आढळून आले असल्याने त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
यानंतर शहरातील  सर्व खाजगी रुग्णालयांनी सीबीआर सिस्टीम वर भरती रुग्ण बाबतची खरी माहिती त्वरित अपडेट करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

यानंतर कोणत्याही खाजगी रुग्णालयाकडून सीबीआर सिस्टीम (CBRS system) वर भरती रूग्णाबाबतची माहिती रोजच्या रोज भरली नसल्याचे आढळून आल्यास त्या सर्व रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा मा.अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिल.  

बातमीच्या मध्ये
Ac square