सर्वात वर

“तो”निर्णय मागे : आता नाशिकच्या खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरु होणार

नाशिक –  कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे सांगत कोविड सेवा (Covid Patients) बंद करण्याचा निर्णय हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतलेला निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांच्याशी  केलेल्या चर्चेनंतर असोसिएशनने दुसऱ्याच दिवशी हा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे .

आज  दुपारी  स्थायी समिती अध्यक्ष श्री गणेश गीते यांच्या सोबत  हॉस्पिटल ओनर असोसिएशन चे पदाधिकारी आणि नाशिक मधील विविध संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक  झाली, यात नाशिक मधील हॉस्पिटल्स मध्ये येणाऱ्या अडचणी  यांची सविस्तर चर्चा झाली त्या वेळी आरोग्य विभागाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे सर, डॉ. आवेश पलोड, डॉ. प्रशांत शेटे आदी उपस्थित होते. यानंतर नाशिक मनपा आयुक्त श्री कैलास जाधव यांची HOAN च्या पदाधिकाऱ्यांशी बैठक झाली.

हॉस्पिटल ओनर असोसिएशन,नाशिक यांनी कोरोना रुग्ण सेवेबाबत मा.ना.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना पत्र दिले होते.त्या अनुषंगाने या असोसिएशन ला मा.आयुक्त कैलास जाधव यांनी चर्चेसाठी बोलविले होते.त्याबैठकीत मा.आयुक्त कैलास जाधव यांनी या शिष्टमंडळाला सांगितले की आपण सामंजस्याची भूमिका ठेवून रुग्णांना उत्तम सेवा द्यावी तसेच त्यांना असणाऱ्या विधायक समस्या प्रशासनाकडून सोडवल्या जातील.असे आश्वासन देण्यात आले. 

हॉस्पिटल ओनर असोसिएशन,नाशिक यांनी  त्यांना कामकाज करत असताना जाणवत असणाऱ्या समस्या संदर्भात मा.आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा झाली त्यावेळी असोसिएशनच्या वतीने मोठ्या रुग्णालयाने ऑक्सीजन प्लांट उभारणी करणे,ऑक्सीजन वाहतुकीचे दर असे विविध मुद्दे यावर मा.आयुक्त कैलास जाधव यांच्या समवेत झालेल्या बैठकीत चर्चा झाली.तसेच त्यांना कामात येणाऱ्या अडचणी यावेळी सांगितल्या यावेळी सांगितले.मा.आयुक्त कैलास जाधव यांनी हॉस्पिटल ओनर असोसिएशन नाशिक यांना सांगितले की आपल्याकडून सामंजस्याची भूमिका ठेवा रुग्णांना सेवा द्या आपल्यावर अन्याय झाल्यास त्यावेळी प्रशासन आपल्या बरोबर राहील मात्र आपण शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे आपल्याला विधायक समस्या असतील त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे मा.आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. 

या बैठकीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे,हॉस्पिटल ओनर असोसिएशन नाशिकचे डॉ. राज नगरकर डॉ. समीर आहेर,डॉ.श्याम पाटील डॉ.सुनील जगताप डॉ.अमोल वाजे डॉ.देवेंद्र येवले , डॉ.जगदीप राजेबहाद्दर डॉ.मुकेश अग्रवाल डॉ.शोधन गोंदकर डॉ.मयूर सरोदे डॉ.अजित बोरस्ते डॉ.राहुल शिंदे डॉ.शरद देशमुख डॉ.सागर केळकर डॉ.पंकज देवरे डॉ.देवेंद्र खैरनार डॉ.सचिन देवरे आदी उपस्थित होते.