सर्वात वर

राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसा निमित्त मनसे तर्फे पेट्रोलवर ५३ रु. सूट !

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या ५३ व्या वाढदिवसा निमित्त ठराविक पेट्रोल पंपांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे सर्व सामान्य नागरिकांना पेट्रोल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल वर तब्बल ५३ रु. एव्हढी भरघोस सूट देण्यात आली. आधीच कोरोना महामारीमुळे रोजगारावर प्रतिकूल परिणाम झालेल्या व त्यात पेट्रोल / डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने होरपळून निघालेल्या सर्व सामान्य जनतेला काही अंशाने का होईना दिलासा मिळावा ह्या उद्दात हेतूने राबविण्यात आलेल्या ह्या उपक्रमाचे नाशिककरांनी अगदी मनापासून कौतुक केले. सकाळ पासून पेट्रोल पंपावर ही सूट मिळविण्यासाठी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप दत्तु दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, मनविसे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड, मनविसे शहराध्यक्ष संदेश जगताप, शारीरिक सेना शहराध्यक्ष विजय आगळे, मनसे रोजगार व स्वयं रोजगार विभाग शहराध्यक्ष सिद्धेश सानप, मनविसे शहर सरचिटणीस पंकज बच्छाव, पंकज दातीर, बबलु ठाकुर आदि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष अंकुश पवार, मनविसे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड यांनी केले होते.