सर्वात वर

नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल मधून दीड वर्षाच्या मुलीला पळवले

 सर्व घटना सी सी टीव्ही मध्ये कैद 

नाशिक- नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल (Nashik Civil Hospital) मधून दीड वर्षाच्या मुलीला पळवून नेण्याची धक्कादायक घटना आज नाशिक मध्ये घडल्याने सर्वत्र खळबळ उधळी आहे. नाशिकच्या  जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या महिलेची दीड वर्षांची मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना आज घडली असून मुलीला पळवून नेणारा व्यक्ती सीसी टीव्ही मध्ये कैद झाला आहे. 

आज नाशिक शहरातील एक महिला आपल्या बहिणीसोबत दीड वर्ष वयाच्या मुलीला घेऊन सिव्हीलमध्ये (Nashik Civil Hospital)  आपल्या नियमित तपासणीसाठी आपल्या बहिणी सोबतआली होती. यावेळी दीडवर्षच्या बाळाला बाहेरील बाकड्यावर बसवून महिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली होती. महिलेची बहिणीचे लक्ष नसल्याची संधी साधत एकाअज्ञात व्यक्तीने चपळाईने त्या मुलीला उचलून नेले. ही घटना लक्षात येताच महिलेने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत ही व्यक्ती निघून गेलेली होती. ही घटना घडली त्यावेळी सुरक्षारक्षक जेवणासाठी बसले होते. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सरकारवाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हाती आलेल्या फुटेजवरुन तपास सुरू केला आहे