सर्वात वर

नाशिक शहरात एक दिवसाची पाणी कपात ?

नाशिक – मान्सूनने नाशिककडे पाठ फिरवल्यामुळे कोरोनाच्या संकटा नंतर नाशिककरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. नाशिक शहराला (Nashik city) पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ ४० दिवस पुरेल इतकाच पाणी पुरवठा उपलब्ध असल्याने प्रशासन आठवड्यातून एक दिवस शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे. 

नाशिक शहराला (Nashik city) पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ ४० दिवस शहराला पाणी पुरवठा होईल एवढाच साठा उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ६ दिवसात धरण क्षेत्रात पाऊस न झाल्यास पुढच्या आठवड्यापासून दर बुधवारी नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचा निर्णय प्रशासना तर्फे घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. 

या बाबत महापौर सतीश कुलकर्णी यांच्याशी जनस्थानने संपर्क साधला असता येत्या सहा दिवसात धरण क्षेत्रात पाऊस न झाल्यास दर बुधवारी नाशिकमध्ये पाणी कपात होऊ शकते असे त्यांनी सांगितले. 

त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण क्षेत्रात पाऊस न झाल्यास नाशिककरांना पाणी कपातीचा सामना करावा लागेल.महापौर श्री सतिश नाना कुलकर्णी यांनी शहरवासीयांना भविष्यात दिसणारे पाणी संकट टाळण्यासाठी पाणी जपुन वापरण्याचे आवाहन केले आहे.