सर्वात वर

ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीचे प्रमुख जितेंद्र भावे यांचे वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन

 भावेंच्या आंदोलना नंतर रुग्णाचे दीड लाख रुपये हॉस्पिटल प्रशासनाने दिले परत 

नाशिक – नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात “ऑपरेशन हॉस्पिटल”(Operation Hospital) चळवळी”मुळे काही खाजगी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या रुग्णांची आर्थिक लूटीला  “ऑपरेशन हॉस्पिटल” (Operation Hospital) चळवळीमुळे काहीसा वचक बसला असून “ऑपरेशन हॉस्पिटल” चळवळीचे प्रमुख जितेंद्र भावे यांनी आज नाशिक शहरातील बहुचर्चित   वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये केलेल्या अर्धनग्न आंदोलनामुळे रुग्नाच्या मुलाने डिपॉझिट केलेली रक्कम परत मिळाली हे सर्वानीच सोशल मिडिया द्वारे सर्वानीच पहिले आहे.

आजच्या आंदोलनामुळे सर्वांना “लगे रहो मुन्नाभाई” या चित्रपटातील एका सीन ची आठवण झाली.असाच चा काही प्रकार नाशिकच्या बहुचर्चित  वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये घडला. पण चित्रपटातील तो सीन पेंशन मिळावे म्हणून होता पण आजचा सीन मात्र कोरोना रुग्णाचे भरलेले डिपॉझिट  परत मिळण्या साठी होता.भरले डिपॉझिट परत न दिल्यामुळे वोक्हार्ट हॉस्पिटलच्या  विरोधात ऑपरेशन हॉस्टिपल (Operation Hospital) मोहिमेंतर्गत आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रूग्णालयाच्या कार्यालयासमोर कपडे काढत कपडे विका आणि पैसे वसूल करा असा पवित्रा घेत आंदोलन छेडले. आंदोलनानंतर रूग्णालय प्रशासनाने रूग्णाच्या नातेवाईकांना डिपॉझिटचे पैसे परत देण्याची तयारी दर्शवल्यानंतर मोहिम फत्ते झाली. या आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांना मुंबईनाका पोलीसांनी ताब्यात घेतले.

सिन्नर येथील रहिवासी अमोल जाधव यांनी आपल्या आई, वडीलांना कोरोना उपचारासाठी नाशिकच्या वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले होते  १४  दिवसांच्या उपचारापोटी त्यांनी सुमारे दहा लाख रूपयांचे बिल अदा केले. रूग्णांना दाखल करतांना त्यांनी दिड लाख रूपये डिपॉझिटही भरले. रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर जाधव यांनी आपली डिपॉझिटची रक्कम परत मिळवण्यासाठी हॉस्पिटलकडे पाठपुरावा सुरू केला. जाधव हे एका कंपनीत सात हजार रूपये पगारावर काम करतात. डिपॉझिट भरण्यासाठी व्याजाने पैसे आणल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वारंवार हेलपाटे मारूनही रूग्णालयाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.

अखेर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्याकडे तक्रार करत मदत मागितली. भावे यांनी ऑपरेशन हॉस्पिटल मोहिमेंतर्गत रूग्णालयात आंदोलन छेडले. यावेळी त्यांनी अंगावरचे कपडे काढत जोपर्यंत डिपॉझिटची रक्कम परत दिली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला. अखेर अर्धातासानंतर रूग्णालय प्रशासनाने डिपॉझिटची रक्कम परत करण्याची तयारी दर्शवल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनानंतर भावे यांना मुंबईनाका पोलीसांनी ताब्यात घेतल्या नंतर सात तासाने त्यांची सुटका केली असल्याचे वृत्त आले आहे.