सर्वात वर

ऑपरेशन ऑक्सिजन चळवळीतील कार्यकर्ते हर्षद कोल्हे यांचे कोरोनाने निधन

नाशिक :आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक व्याधीग्रस्त रूग्णांना जीवदान देणारे विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेड मिळत नसलेल्या बाधीत रूग्णांचा श्वास थांबू नये म्हणून आॕपरेशन ऑक्सिजन (Operation Oxygen) चळवळीतून शेकडोंचा जीव वाचविण्यासाठी धडपड करणारा मराठा क्रांती मोर्चाचा धडाडीचा समन्वयक हर्षद कोल्हे यांचे कोरोनामुळे निधन झाले ते ३१ वर्षांचे होते. 

गेले काही दिवस हर्षद कोव्हिड १९ वर उपचार घेत होता.माञ गुरूवारी हर्षदचा श्वास थांबला.एका खासगी रूग्णालयात  सात ते आठ दिवस उपचार करून देखील हर्षदच्या  प्रकृतीत सुधारणा झाली नाही.अखेर तो व्हेंटिलेटर गेला आणि दोनच दिवसात त्याची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली.

निःशुल्क ऑक्सिजन सेवेचा वसा घेतलेल्या नाशिक शहरातील अनेक मावळ्यांनी  ५०० हून अधिक रूग्णांना आॕक्सीजन (Operation Oxygen) उपलब्ध करून दिला.त्या मावळ्यांपैकी एक असलेला हर्षद कोल्हे माञ अवघ्या एकतीसाव्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला.हर्षदच्या मागे आई आणि पत्नी असून त्याच्या अकाली निधनाने कोल्हे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेने पंचवटीत कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचे सावट पसरले असून  नाशिक जिल्ह्यातील सर्व सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी कोविड काळात काम करताना आपण स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य तुषार जगताप यांनी  केलं आहे.