सर्वात वर

‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईला ऑरेंज अलर्ट :अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी

केरळ, तामिळनाडू, गोवा किनारपट्टी ओलांडून ‘तौत्के’  चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं  

मुंबई – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा(Cyclone Tautke) परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला जाणवतो आहे. रत्नागिरी व राजापूर तालुक्या जवळून गेल्यानंतर हे चक्रीवादळ पुन्हा एकदा समुद्रात आतील बाजूस सरकून त्याची उत्तरेकडे वाटचाल सुरु आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये काळ पासूनच तुफान पाऊस सुरु आहे. अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’चक्रीवादळामुळे मुंबईत सकाळपासूनच जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.नाशिक शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस सुरु असून मोठया प्रमाणावर वादळी वारे सुटले आहे. 

 चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना जोरदार तडाखा बसला आहे.   त्यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत सुमारे १२ हजार ४२० नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले  आहे.   

मुंबईत चक्रीवादळाचे (Cyclone Tautke) परिणाम दिसत आहेत,मुंबईत अनेक भागात झाडं पडली आहेत, वरळी सीलिंक सुरक्षतेसाठी बंद ठेवला आहे दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे तरसमुद्राला उधाण आल्याने समुद्राचं पाणी आणि पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरल्याने नागरिक हैराण झाली आहेत मुंबईचा वरळी केळीवाडा ही जलमय झाला आहे. मुंबईतील विमानतळ खबरदारीचा उपाय म्हणून ११ ते ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. मुंबईकरांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

मुंबईत  वादळाचा वेग ८० ते ९० किमी प्रति तास

‘तौत्के’ वादळाची तीव्रता वाढली असून , मुंबईत ८० ते ९० किमी प्रति तास वादळाचा वेग आहे, हे वादळ गुजरातला १० ते ११ च्या दरम्यान पोहचेल, वादळाचा (Cyclone Tautke) गुजरातकडे जाणारा वेग ताशी १६५ किमीच्या जवळपास असणार असून, खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातमधील विमानतळ  देखील बंद ठेवली आहेत, महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळाची तीव्रता असणार आहे, इतर भागात वादळी वाऱ्यासह हलक्या सरी, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं IMD चे कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे.