सर्वात वर

शेतक-यांच्या सुविधेकरिता ओरिगोचा डिजिटल ऑक्शन प्लॅटफॉर्म

मुंबई: कृषी भागधारकांसाठी नव्या युगातील सुविधा पुरविणारा भारतातील आघाडीचा अॅग-फिनटेक स्टार्टअप ओरिगो ई-ऑक्शन सर्व्हिसच्या लाँचिंगद्वारे (Origo’s Digital Auction Platform) आता सर्व यूझर्ससाठी एक समग्र अनुभव देण्यास सक्षम बनला आहे. या फीचरमुळे वस्तूंचा अखंड व्यापार करता येतो. तसेच आपल्या वस्तू खरेदी-विक्रीचा पारदर्शी आणि डिजिटल मार्ग तयार झाला आहे. प्राइस डिस्कव्हरी, प्राइस रिस्क, ट्रेड सेटलमेंट, फॉरवर्ड अँड रिव्हर्स ऑक्शन इत्यादी शेतकरी, ट्रेडर्स आणि प्रक्रियाकर्त्यांच्या गरजा आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर (Origo’s Digital Auction Platform) हे सर्व पर्याय उपलब्ध आहेत.

ओरिगोच्या ई-ऑक्शन प्लॅटफॉर्मवर (Origo’s Digital Auction Platform) सहभागींना त्यांच्या स्थानावरूनच मोबाइल फोनवरून डिजिटली नाव नोंदणी कता येईल. त्यानंतर त्यांना पुढील लीलावाचे नोटीफिकेशन मिळेल. जेणेकरून ते त्यात सहभागी होतील. लीलावातील पारदर्शकता, सर्व कागदपत्रे व पेमेंट ट्रॅकिंग मोबाइलवर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट अधिक वेगाने आणि थेट त्यांच्या खात्यात मिळेल. ऑक्शन प्लॅटफॉर्मवर (विक्रीसाठी) ऑफरवर्ड ऑक्शन आणि (खरेदीसाठी) रिव्हर्स ऑक्शन कमोडिटीजची सुविधा उपलब्ध आहे.

ओरिगोचा ऑक्शन प्लॅटफॉर्म (Origo’s Digital Auction Platform) खाजगी आणि सरकारी संस्था अशा दोघांसाठीही उपयुक्त आहे. सरकारी संस्था अतिरिक्त साठ्याची खुल्या बाजारात सहजपणे विक्री करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म वापरू शकतात. तर्फे सांगण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांकडून एमएसपी खरेदीकरिता त्यांच्या ठेवींसाठी तत्काळ डिजिटल पेमेंट्ससह या प्लॅटफॉर्मचा वापर होईल.