सर्वात वर

अन्यथा कडक लॉक डाऊन करावे लागणार – जिल्हाधिकारी सुरज मांढरे

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा व्हिडीओ द्वारे नाशिककरांना संदेश

नाशिक – कोरोनाच्या महामारीतून कुठे तरी बाहेर पडू असे वाटत असतांना गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होते आहे.अनेक ठिकाणी नागरिक नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहेत.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतील.नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास मागच्या पेक्षा कडक लॉक डाऊन(Lock Down) करावा लागेल असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे. 

मागच्या वर्षी मार्च महिन्यात लॉक डाउन असतांना नाशिक मध्ये  केवळ एकच पेशंट होता.परंतु या वर्षी ही संख्या पंधराशेच्या पुढे गेली आहे .आपल्या जिल्ह्यामध्ये  कोरोना बाधितांचा सर्वाधिक आकडा ११ हजार होता त्यानंतर  १५ दिवसांपूर्वी नाशिकच्या कोरोना बाधितांनाची संख्या एक हजारच्या खाली गेलेला असतांना गेल्या दोन तीन दिवसात ही संख्या सातत्याने वाढत आहे ही गंभीर बाब आहे. हा आकडा आता १५४४ इतका झाला आहे.त्यामुळे मागच्या वर्षाची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती ही वाटायला लागली आहे..नागरीक मास्कचा वापर करतांना दिसत नाहीत,शारीरिक अंतर पाळत नाही असे गंभीर चित्र दिसायला लागले आहे.हे चित्र टाळायचे असेल तर काळजी घेणे हे महत्वाचे आहे.

नागरीक ऐकणारच नसतील तर कठोर पावले उचलल्या शिवाय पर्याय नाही. या वेळेचा लॉक डाऊन (Lock Down) फार गंभीर स्वरूपाचा असेल असे हि त्यांनी स्पष्ट केले. नागरीकांनी सार्वजनिक कार्यक्रमाला जाणे टाळावे असे हि आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा संदेश 

https://youtu.be/Z4xtxh2fQfU