सर्वात वर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

बातमीच्या वर

पंढरपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते.एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.कोरोना मधून बरे झाल्या नंतर त्यांना डेंग्यूची लागण झाली,दोन आठवड्या पूर्वी त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचे पश्चात आई, पत्नी ,पुत्र भगीरथ आणि ३ विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. 

भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल शुक्रवार (२७ नोव्हेंबर) दुपारी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. रुबी हॉल रूग्णालय प्रशासनाकडून आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास उपचार सुरू असतानाच यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर पंढरपुरातील सरकोली या त्यांच्या जन्मगावी आज शनिवारी (२८ नोव्हेंबर) अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली