सर्वात वर

पॅशन फ्रूट-(आहार मालिका क्र – १८)

डॉ. राहुल रमेश चौधरी 

विदेशी फळफळावळ मध्ये आपण आज पॅशन फ्रूट (Passion Fruit)बद्दल माहीती बघूयात.असे म्हटले जाते मज्जाविकारांमध्ये म्हणजेच आयुर्वेदानुसार सहाव्या क्रमांकाच्या धातुशी निगडीत विकारात हे फ्रूट अतिउत्तम होय.passiflora incarnate,passiflora edulss या नावाने ओळखले जाणारे हे फळ स्वादिष्ठ सरबता साठी प्रसिध्द.मूळचे ब्राझिल,पेरुग्वे मध्ये लागवड केले जाणारे हे फळ भारतात देखिल आता बघायला मिळते.वेली गटातील या फळाची व फुलाची लागवड आता अर्जेन्टीना,आफ्रिका,अमेरिका या देशात होते.भारतात आंध्रप्रदेशात याची जास्त लागवड होते.साधारण आकाराने २.५ ते ४ से.मी गोलाकार असलेले हे फळ पिवळ्या जांभळ्या रंगाची आढळतात.चव याची आंबट गोड असते.

पॅशन फ्रूटचे (Passion Fruit) आरोग्यास फायदे   

.या फळात ९७ कि.कॅलरी एवढी उर्जा असते.

२.vit B2,B3,B6,B9 ,colin व vitamin c  यात भरपूर मिळते.तसेच कॅल्शिअम,मॅग्नेशिअम,स्फुरद,पोटॅशिअम,सोडिअम,जस्त यात प्रचूर मिळते.

३.या फळाच्या सालीचा उपयोग दमा असलेल्या रुग्णांकरीता केला जातो.

४.या फळात पोटॅशिअम चे प्रमाण अत्युच्च असल्याने नियमीत सेवनाने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

५.आयुर्वेदानुसार चालू असलेल्या संशोधनात हे फळ वात व कफ दोष नाशक सांगितलेले आहे.

६.पेरुग्वे देशाने या फळाच्या फुलाला राष्ट्रीय फुलाचा दर्जा दिलेला आहे तसे हे फुल अतिबहुगुणी आहे.या फुलाचया टिंक्चर चा वापर केला जातो.निद्रानाश,अस्वस्थता,डोकेदुखी,झटके येणे ,या करीता हे फुलाचा टिंक्चर वापरला जातो.

.या फळापासून बनवली गेलेली वाईन भूक वाढवते.

८.याच्या वेलीचे कोवळे कोंब शिजवून खाल्ल्याने मज्जा धातु ला बळ मिळते.

.लहान मुले काहीना काही कारणाने अस्वस्थ झाल्यास याच्या टिंक्चर चे थेंब  पाण्यात मिसळून दिल्यास फरक मिळतो

१०.रस धातु बळकट करण्यासाठी याचा फळाचा सिरप चा उपयोग होतो.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी 


संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०