सर्वात वर

अननसाचे आरोग्यास फायदे (आहार मालिका क्र – ८)

डॉ.राहुल रमेश चौधरी 

काही फळ ही अशी असतात कि जी आपल्या चवीने सगळ्यांना भूरळ घालतात.त्यापैकीच् एक म्हणजे  अननस होय.मूळत: ब्राझिल,पॅराग्वे,अमेरिका येथील आपल्या भारताचे नसलेले पण भारतात प्रसिध्द पावलेले Pineapple हे फळ होय.सिंगापूर.ब्रह्मदेश,फिलिपाईन्स,या देशात सर्वात जास्त उत्पादन होते,व श्रेष्ठ प्रतीचे फळ मिळते.जमिनीला लागून काटेरी पानांवर षट्कोन,पंचकोन आकारांनी मढलेले हे मनमोहक व आकर्षक असे अननस फळ असते,याचे वजन  अर्धा किलो पासून २ ते ३ किलोपर्यंत देखील जाते.केरळ,कर्नाटक,बिहार,गोवा,महाराष्ट्र,पश्चिम बंगाल,उत्तरीपूर्व राज्यांमध्ये याचे उत्पादन होते. जॅम,जेली,सरबत,आईस्क्रीम,मुरांबा अश्या विविधतेसाठी प्रसिध्द असलेले हे हंगामी फळ मनाला फारच भावते.रस्त्याच्या कडेला लाल कापड टाकून त्यावर बर्फावर गोल आकारात कापून ठेवलेलेया फोडी लहान मुलांच्या हट्टाचे आकर्षण असते.

पण…अश्या या अननसाचे(Pineapple) फायदे काय आणि तोटे काय हे आपण आजच्या आहारमालिकेत पाहूयात.कच्चे फळ आणि पिकलेले फळ असे दोन भेद आहेत,त्यानुसार याचे आपण उपयोग बघूयात.

अननसाचे (Pineapple)आरोग्यास फायदे

१.फळ वापरताना पिकलेलेच वापरावे,शक्यतो कच्चे फळ खावू नये,कच्च्या फळाने पोट दुखणे,पोट जड पडणे,जुलाब होणे असे त्रास होतात,हे पचनाला खूप जड पडते.

२.कच्चे फळ गर्भवती स्त्रीने खावू नये याने गर्भपात होतो.किंवा न झाल्यास गर्भातील बाळाला खूप त्रास होतात.

३.खरूज ,गजकर्णात खूप खाज सूटत असल्यास त्यावर पिकलेल्या अननसाचा रस चोळून लावावा.

४.पिकलेले फळ सुगंधी आणि गोड आंबट चवीचे असते.जेवणापूर्वी अननस रस ,मीठ,मिरे एकत्रीत घेतल्यास पाचक स्त्राव भरपूर स्त्रवतात व मांसाहार देखिल सुखाने व्यवस्थित पचतो.

५.भूक मंद होणे,शौचाला २-२ ३-३ दिवस न होणे,गॅस होणे,चव नसणे ,आतड्याची गती मंदावणे अश्या विकारात अननसाच्या फोडी चावून चावून खाव्यात.

६.लघवी ला जळजळ होणे,कमी होणे,लघवीस उग्र वास येणे याकरीता अननस रस व साखर एकत्र करून घेतल्यास त्रास कमी होतो.

७.अजीर्णाने उलट्या जुलाब होत असल्यास लंघन करावे व अननस साखर मिरे याचे मिश्रण थोडे थोडे घ्यावे.

८.अननसाच्या चटणीने मुळव्याधी चे कोंब शेकल्यास वेदना कमी होतात.

९.जिभेला चव नसणे,घसा-गळा-गाल यात जडपणा वाटणे यामध्ये अननस रसाच्या गुळण्या कराव्यात.

१०.यकृताकडून पित्तनलिकेद्वारे पित्तस्त्राव चे काम थांबल्याने कावीळ होते यात शौचास तिळेच्या पेंडेप्रमाणे भसरट पांढरे होते यावेळी अननस रस व काळे मिरे दिल्याने बरे वाटते.

११.जंत झालेले असल्यास अननसाच्या फोडी चावून चावून खाव्यात.

१२.साखर टाकून खाल्ल्यास काही प्रमाणात हे पित्तशामक,व  ह्रदयाला हितकर व आल्हाददायक ठरते.

सावधान…………!!!!!!!

१.अम्लपित्त,वारंवार सर्दि,अस्थमा,श्वसनाचे विकार,कफाचे विकार असलेल्यांनी याचा वापर मुळीच करु नये.

२.पित्ताची प्रकृती असलेले,मद्यपान करणारे भुक सतत लागणारे यांनी अननस रिकाम्या पोटी खाणे अयोग्य आहे.

३.लहान मुलांना अननस मुळीच देवू नये याने आमाशय(पोट) व आतड्यांवर दुष्परिणाम जाणवतात.

४.अननसाचे मिल्कशेक,आईस्क्रिम हे सर्वात धोकादायक पदार्थ आहेत याचे सेवन रोगांना आमंत्रण देतात याने विविध त्वचाविकार अम्लपित्त व श्वसनाचे विकार संभवतात.याचे सेवन टाळावे.

५.गर्भिणी स्त्रीने याचे सेवन सर्वथा टाळावे.

वैधानिक इशारा

वरील सर्व प्रयोग प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने करावेत.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी 

औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र   

संपर्क-९०९६११५९३०