सर्वात वर

नाशिकच्या प्रसाद देशपांडेच्या “लक्ष्मी” लघुपटाला अमेरिकन संस्थेचा प्रथम पुरस्कार

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा : लघुपटात आरोग्याविषयी जनजागृती 

नाशिक – नाशिकचे कलावंत प्रसाद देशपांडे यांनी कोरोनाच्या काळात जनजागृती व्हावी म्हणून ‘लक्ष्मी’ (Lakshmi) नावाचा एक लघुपट (Short Film) तयार केला. या लघुपटाला ‘अमेरिकन सोसायटी ऑफ सेफ्टी प्रोफेशनल’ या अमेरिकेतील नामांकित संस्थेच्या जागतिक स्तरावरील भारतात झालेल्या  ९ व्या भारतीय प्रोफेशनल डेव्हलपमेंट कॉन्फरन्स मधील सुरक्षा आणि आरोग्य यावरील लघुपट स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे, त्याबद्दल त्यांना सर्टिफिकेट देऊन सन्मानित केले आहे.देशपांडे यांना मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशासाठी त्यांचे नाशिकमधून आणि महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

सध्याच्या परिस्थितीत कोरोनाने आपणांस स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेऊन स्वतः सुरक्षित राहणे हे किती महत्वाचे आहे हे दाखवून दिले आहे,आरोग्य सुरक्षित तर आपण सुरक्षित! पण आरोग्य हे नेहमीच चांगले सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आपल्या घरात, परिसरात स्वच्छता ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे कारण अस्वच्छतेमुळे अनेक  रोग पसरतात आणि आपण आजारी पडून रुग्णालयात दाखल होतो असे होऊ नये म्हणून नाशिकच्या हौशी कलाकाराने आरोग्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून हा लघुपटाची (Short Film) निर्मिती केली आहे. 

प्रसाद देशपांडे हे व्यवसायाने सुरक्षा पर्यावरण आणि आरोग्य अधिकारी म्हणून एक खाजगी कंपनीत कार्यरत आहे,  फिल्म क्षेत्रातील कोणत्याही शिक्षण,अभ्यास,अनुभव नसताना केवळ हौसेपोटी ते  लेखना सॊबतच ते माऊली क्रिएशन बॅनर खाली सुरक्षा, पर्यावरण आणि आरोग्य तसेच अनेक सामाजिक विषयावर लघुपट निर्मिती करीत असतात,२०१५ साली नाशिकच्या कुंभमेळा साठी त्यांनी प्रथमच गंगा म्हणजे  पाणी प्रदूषणावर पहिला ‘गंगा माँ का दर्द’ हा लघुपट (Short Film) तयार केला होता आणि त्याला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट लघुपट म्हणून सन्मानित केले होते त्यानंतर त्यांनी अनेक लघुपट बनविले.अनेक फिल्म महोत्सवात त्यांच्या लघुपटाला सन्मानित केले आहे,