सर्वात वर

पुण्याच्या १६ वर्षीय प्रथमेश जाजूने ५० हजार प्रतिमांमधून साकारले चंद्राचे रंगीत छायाचित्र

सोशल मिडिया सह जगात होतंय प्रथमेशचे कौतुक

पुणे -प्रत्येकालाच चंद्राविषयी प्रचंड कुतूहल असतेप्रत्येकाला चंद्राकडे बघून फोटो काढायची इच्छा होते. कधीकधी सर्वांनाच चंद्राचा पृष्ठभाग जवळून पाहण्याची प्रचंड इच्छा होते. चंद्र वैज्ञानिकांपासून ते अगदी लहानमुलांसह सर्वांसाठीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. अशा या चंद्राची काही सुंदर छायाचित्रे पुण्यातील प्रथमेश जाजू (Prathamesh Jaju) या १६ वर्षीय तरुणाने टिपली आहे. हि छायाचित्र जगभरात चर्चेचा विषय ठरली असून हि छायाचित्रे प्रचंड व्हायरल झाली आहेत.

Prathamesh Jaju  Created a Colorful Picture of Moon

पुण्यातील प्रथमेशने (Prathamesh Jaju) चंद्राची एकदोन नव्हे तर, तब्बल ५५ हजार रुपं त्याच्या कॅमेरात कैद केली आहेतज्योर्तिर्विद्या परिसंस्था येथे काम करणाऱ्या या तरुणाने ३ मेच्या रात्री १ ते पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या घराच्या टेरेसवरून चंद्राची जवळपास ५५ हजार छायाचित्र काढली आहेत.यामध्ये चंद्राच्या छोट्या छोट्या भागांचाही समावेश आहे.प्रथमेशने टेलिस्कोप आणि त्याच्याजवळ असणाऱ्या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं चंद्राची ही रुपं टीपली आहेत या साठी त्याने १८६ जीबी वापरला.

Prathamesh Jaju  Created a Colorful Picture of Moon

काढलेल्या छायाचित्रांना जोडून त्याने एक छायचित्रे तयार केले यानंतर चंद्राचा एक सुरेख असा अदभूत फोटो हाती आला.हा फोटो कितीही प्रमाणात झूम केला तरीही तो पिक्सलेट होणार नाही अशाच प्रतीचा होता.या छायाचित्राची संपूर्ण जगात आता चर्चा होते आहे.

Prathamesh Jaju  Created a Colorful Picture of Moon
सर्व छायाचित्र प्रथमेश जाजूच्या इंस्टाग्रामवरून साभार

१६ वर्षाच्या प्रथमेशला (Prathamesh Jaju) हि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळपास ३० ते ४० तास लागले दहावीत शिकत असणारा प्रथमेश सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर त्याचे २६ हजार ५०० फॉलोअर्स आहेत.या प्रक्रियेसाठी सर्वात आधी प्रथमेशने अनेक माहिती वाचल्या होत्या. अनेक व्हिडिओज पाहिले होते. ज्याला ही प्रोसेसिंग आणि त्या फोटोला क्लिक करण्यासाठी माहिती मिळावी यासाठी. प्रथमेशला एक अॅस्ट्रोजिक्स बनायचे आहे. एक प्रोफेशनल म्हणून अॅस्ट्रोनॉमी शिकायचे आहे. परंतु, प्रथमेश सध्या अॅस्ट्रो फोटोग्राफी एक छंद म्हणून करीत आहे.प्रथमेशने या छायाचित्राचे नाव ‘लास्ट क्वार्टर मिनरल एचडीआर मून’ असे ठेवले आहे.


सर्व छायाचित्र प्रथमेश जाजूच्या इंस्टाग्रामवरून साभार